घरमहाराष्ट्रपंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकदिवसीय महाराष्ट्र दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकदिवसीय महाराष्ट्र दौरा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय महाराष्ट्र दौरा आहे. या भेटीदरम्यान विविध विकासकामांचे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, शनिवारी महाराष्ट्र दौरा होणार आहे. पंतप्रधान मोदी थोड्याच वेळापूर्वी नागपूर विमानतळावर दाखल झाले आहे. यवतमाळ आणि धुळे जिल्ह्यात मोदींच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन करणार असून लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार असल्याची माहीती मिळत आहे. आज सकाळी ११ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. यवतमाळ येथे १७ हजारापेक्षा जास्त बचत गट चांगले कार्य करत असल्यामुळे बचत गट चालविणाऱ्या महिलांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास धुळे येथे होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित राहणार आहेत.

विकास कामांचे उद्घाटन

  • मनमाड-धुळे- इंदौर रेल्वेमार्ग
  • सुळवडे-जामफळ उपसा सिंचन योजना
  • अक्कल पाडा धरण ते धुळे शहर पाईप लाईन योजना भुमिपूजन इ. विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -