माझ्या धमक्यांमुळे सोडून गेले की, खोक्यांसाठी? शिंदे गटाने भूमिका स्पष्ट करण्याची राऊतांची मागणी

माझ्या धमक्यांमुळे सोडून गेले की, खोक्यांसाठी? शिंदे गटाने भूमिका स्पष्ट करण्याची राऊतांची मागणी

बंड करून गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दंडुक्यांनी मारणम्याची भाषा आपण केलीच नव्हती, लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असं भाषण मला वाटतं आज त्यांच्या गटात असणाऱ्या शीतल म्हात्रे यांनीच अलिबागच्या सभेत केलं होतं. शिंदे गटातील आमदार मी धमक्या दिल्यामुळे गेला की शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती केल्यामुळे सोडून गेले की हिंदुत्वासंदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले? शिंदे गट प्रत्येक वेळी आपली भूमिका बदलतात, खोके मिळाल्यामुळे ते सोडून गेला का? असे सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले, तसेच शिंदे गट आमदार नेमकं का गेले ते एकदा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, अशी मागणीही राऊतांनी केली आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणुक आयोगात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान आयोगाने दोन्ही गटांना आपलं लेखी म्हणण मांडण्यासाठी 30 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत दिली होती. दरम्यान शिंदे गटाने मांडलेल्या लेखी भूमिकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांच्या धमकीमुळे आमदार पळून गेले असा धक्कादायक दावा शिंदे गटाने लेखी युक्तिवादात केला आहे. यावरून आता राऊतांनी शिंदे गटाला प्रत्युत्तर दिलं आहे.

राऊत म्हणाले की, धमकीचा विषय आता आला आहे. शिंदे गट माझ्या भाषणाचा उल्लेख करतात ते भाषण ते सुरतहून गुवाहाटीला पोहचल्यानंतर दहिसरला केलेलं आहे. त्यांनी काळजीपूर्वक ते भाषण पाहावं म्हणजे कळेल मी काय बोललो ते. दंडुक्यांनी ह्यांना बडवा ह्यांचा पार्श्वभाग सूजवून काढा असं भाष्य त्यांच्याच गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावरून केलं होतं. त्यानंतर त्या गुवाहाटीला जाऊनशिंदे मिळाल्या. यांच हे वैफल्य आहे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायलय प्रत्येक लढाई ते हरणार आहेत, असाही राऊत म्हणाले.

सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीवर आणि ठाकरे गटावर टीका केली होती. याच टीकेला उत्तर देत राऊत म्हणाले की, अशा कोणत्या फालतू लोकांना उत्तर देण्यासाठी मी बांधिल नाही. आमची भूमिका आम्ही काल मांडली आहे.

अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर डागले टीकास्त्र

यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवरही टीका केली आहे. अर्थसंकल्पात घोषणा फार असतात. इतकीच अपेक्षा आहे की, दोन-पाच उद्योगपतींना, कॉर्पोरेट क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला जाऊ नये. या देशात शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, मजूर आहेत. ते आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर झाला, तर त्याचं स्वागत केलं जाईल. नाहीतर राहुल गांधी म्हणतात तसं, दोनजण खरेदी करतात, दोनजण विकतात. फक्त दोघांसाठीच देशाची अर्थव्यवस्था राबवली जात असले तर हा देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात जाईल आणि जात आहे, म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले.

हिंडनबर्ग रिपोर्टनंतर देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त होण्याच्या मार्गावर

केंद्रीय अर्थसंकल्पाकडे गरीब जनता ज्याप्रकारे पाहतेय त्याप्रकारे आम्ही पाहतोय. आम्ही अदानी किंवा अंबानींच्या विचारांनी काम करणार नाही. देशातील गरीब, शेतकरी, जनतेसाठी ते काय करता येईल त्याचा विचार केला पाहिजे देश आता संकटात आहे. हिंडनबर्ग रिपोर्टनंतर देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या अर्थसंकल्पातून देशाच्या अर्थ व्यवस्थेला ताकद मिळावी, अशी अपेक्षाही राऊतांनी केली आहे.


जम्मू काश्मीरमधील दहशवाद्यांच्या तळाचा भांडाफोड, ‘लष्कर-ए-तोयबा’च्या चौघांना अटक

First Published on: January 31, 2023 10:42 AM
Exit mobile version