‘गँगवॉरमध्ये टोळी मारली जाते…’, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल

‘गँगवॉरमध्ये टोळी मारली जाते…’, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल

टोळीला अस्तित्व नसतं. टोळी गँगवॉरमध्ये किंवा पोलीस एनकाऊंटरमध्ये मारली जाते. हे स्वत:ला टोळी मानत असतील तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावरून निशाणा साधला. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams Shinde Group Gulab Rao Patil)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. “जे मिंधे असतात, मांडलिक असतात, त्यांना स्वत:चे अस्तित्वच नसते. ते भाजपामध्ये विलीन झाले आहेत. त्यांच्यातला स्वाभिमान संपलेला आहे. त्यांना शिवसेनेबरोबर भाजपाची युती करायची होती. पण आता ते आपला पक्ष भाजपात विलीन करत आहेत. त्यामुळे त्यांना एकही जागा नकोय. शिवसेना मात्र यापुढेही संघर्ष करत राहील. त्यांचा एक गट आहे. टोळी आहे. टोळीला अस्तित्व नसते. टोळी गँगवॉरमध्ये किंवा पोलीस एनकाऊंटरमध्ये मारली जाते. हे स्वत:ला टोळी मानत असतील तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. त्यांना एकही जागा नको. जितके दिवस आहेत, तितके दिवस खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असं त्यांचं नियोजन असेल”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

“भाजपचं लोकसभा मिशन, मिशनच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील”, असे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन

First Published on: January 3, 2023 11:22 AM
Exit mobile version