घरताज्या घडामोडीभाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन

Subscribe

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (60) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे.

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (60) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे. (BJP MLA Laxman Jagtap passed away due to Cancer)

शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळी नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले आमदार जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. आता जगताप यांच्यासारखा मोठा आधारस्तंभ निखळल्याने भाजपाला पोरकेपण आले आहे.

- Advertisement -

बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार

आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्च शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आले. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्तीमुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्यूशी दोन हात केले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण दीर्घ प्रयत्नानंतरही अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

सुप्रिया सुळेंनी विहीली श्रद्धांजली

“चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. आपल्या भागातील अतिशय लोकप्रिय नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे जगताप कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली.

मागील वर्षात मुक्ता टिळक यांचे निधन

मागील वर्षात अखेरच्या महिन्यात म्हणजेच 22 डिसेंबर 2022 रोजी भाजपाच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं आज दिर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील गॅलक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुक्ता टिळक या गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील त्या विद्यमान आमदार होत्या. तसंच, पुण्यातील भाजपा नेत्यांच्या यादीत त्यांचं मानाचं स्थान होतं. तर, 2017 ते 2019 या काळात त्यांनी पुण्याच महापौर पदही भुषवलं होतं.


हेही वाचा – भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -