मुख्यमंत्री घरी-मंत्रालयात नसतात, पण वेळ मिळाल्यावर गुवाहाटीला जातात; सुषमा अंधारेंचा षटकार

मुख्यमंत्री घरी-मंत्रालयात नसतात, पण वेळ मिळाल्यावर गुवाहाटीला जातात; सुषमा अंधारेंचा षटकार

कोल्हापूर – कोरोनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) घरात बसून होते. तो काळच असा होता की घरात बसून राहणं गरजेचं होतं. त्या विषाणूची पूर्वअटच अशी होती की एकमेकांशी संपर्क टाळला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून राहायचे. पण आताचे मुख्यमंत्री घरात नसतात. ते घराबाहेर असतात, म्हणजे कुठे असतात? ते घराबाहेर असतात म्हणजे मंत्रालयातही नसतात, असा सणसणीत टोला सुषमा अंधारे (Shivsena Leader Sushama Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लगावला आहे. त्या आज कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा -गृहमंत्र्यांनी विनयभंगाच्या व्याख्येचा अभ्यास करावा; सुषमा अंधारेंचा टोला

मुख्यमंत्री घरात नसतात, घराबाहेर असतात. इतके बाहेर असतात की त्यांना सलाईन लावावं लागतं. ते घराबाहेर असतात म्हणजे कुठे असतात? ते घराबाहेर असतात म्हणजे मंत्रालयात नसतात. ते गणपतीची आरती करत असतात. दांडिया खेळायला जातात. श्राद्धाचं जेवायला जातात. दिल्लीला हुजरे मुजरे करायला जातात. त्यातून वेळ मिळाला की ते गुवाहाटीला कामाख्याला जातात. घरात नसतात. आता तुम्हीच ठरवा तुलनात्मक तुम्हाला कोण हवंय? असा सवालही सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा – बाळा तुझ्या आईने…, सुषमा अंधारेंनी लेकीसाठी लिहिली भावनिक पोस्ट

तत्कालीन मुख्यमंत्री घरात राहिले तरी त्यांनी चांगलं काम केलं. त्यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, असंही त्या पुढे म्हणाल्या.

First Published on: November 16, 2022 12:29 PM
Exit mobile version