महापुरुषांचे योगदान मोठं, विकृत माणसांनी बोध घ्यायला हवा : खा. उदयनराजे

महापुरुषांचे योगदान मोठं, विकृत माणसांनी बोध घ्यायला हवा : खा. उदयनराजे

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यासह इतर महापुरुषांनी देशासाठी अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. त्यांनी जे विचार मांडले, त्यांची उंची सुद्धा आपण गाठू शकत नाही, मात्र आजच्या घडीला जातीं जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरु असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

माध्यमांशी संवाद साधताना समाजात वाढत असलेल्या विकृतींवर उदयनराजेंनी ताशेरे ओढले. ते म्हणाले की समाजात अशा प्रकारची विकृती आहे, त्याच्यात वाढ का होते, हे समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तसेच इतर महापुरुष आहेत. त्यांनी या देशाच्या संपूर्ण प्रगती करता जे विचार मांडले किंवा एकतेबद्दलचा जो विचार मांडले. त्यांची उंची सुद्धा गाठू शकत नाही. या महापुरुषांनी जे योगदान दिले, त्यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे. कारण नसताना जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल. सध्या विरोधक नुसते आरोप करत आहेत, विरोधकांचे सर्व मुद्दे संपलेले आहेत. जो काम करतो त्याला ठेचा लागतात. जे काम करत नाही, बोलणं हेच त्यांचं काम असते. दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याला कसे मिळेल असा विकृत विचार समाजात रूढ होत चालला आहे, पण आजचे लोक सुज्ञ असून लोक विचार करतात, हे राजकारण्यांनी ध्यानात घेतले पाहिजे, असा सल्लाही उदयनराजे द्यायला विसरले नाही.

First Published on: February 11, 2023 8:41 PM
Exit mobile version