अवकाळी पावसामुळे ज्वारीची भाकरी महागली

अवकाळी पावसामुळे ज्वारीची भाकरी महागली

अवकाळी पाऊसामुळे ज्वारीची भाकरी महागली

अवकाळी पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढले आहे. मात्र, यामुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. या परतीच्या पावासामुळे ज्वारीची भाकरी देखील महागली आहे. राज्यात ज्वारीचे मोठे नुकसान झाल्यामुळे ज्वारीच्या दरात वाढ झाली आहे. उत्पन्न कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे पौष्टिक अन्न म्हणून ओळख असलेली ज्वारीची भाकरी देखील महागली आहे. तसेच ज्वारीबरोबरच बाजरी, गहू, हरभरा, मका या पिकानांही याचा फटका बसाला आहे. त्यामुळे या पिकांच्या दरातही वाढ झाली आहे.

जनावरांना लागणारा कडबाही महागणार

इंदापूर तालुक्यातील रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून ज्वारीकडे पाहिले जाते. मात्र, परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यासह पुण्यालाही झोडपल्यामुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीच्या नुकसानीमुळे एकीकडे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीसाठी आणलेल्या ज्वारीतही मोठी घट झाली आहे. ओल्या दुष्काळामुळे इंदापूर तालुक्यातील शेकडो एकच शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याचा पटका जनावरांना लागणारा कडबाही महागणार आहे.

पिकांचा दर प्रति क्विंटल

ज्वारीचा दर – २८०० ते ३८०० रुपये
बाजरी – १८०० ते २४०० रुपये
गहू – १९०० ते ३६०० रुपये
हरभरा – ३७५१ रुपये
मका – १७५१ ते १८५१ रुपये


हेही वाचा – Live: राज्यातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू


 

First Published on: November 25, 2019 11:04 AM
Exit mobile version