लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत – राजेश टोपे

लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत – राजेश टोपे

..तर ३ दिवसांत महाराष्ट्रातील लसीकरण बंद पडेल - आरोग्यमंत्री

सध्या देशभरात सर्वत्र कोरोना लसीकरण सुरू आहे. त्यामुळे कोरोना लसीसंदर्भात अनेक साईड इफेक्ट समोर येत आहे. पण महाराष्ट्रात लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. राज्यात सध्या आरोग्य ६५२ केंद्र असून लसीकरण आरोग्य विभाग ४ लाखांच्या आसपास आहेत. दररोज ५० हजारांपर्यंत लसीकरण होत आहे. लसीकरणाला विरोध नसून लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे सर्वांना लस घेण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच लसीकरण झाले म्हणून आता आपण Covid Appropriate Behavior म्हणजे मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे आणि सॅनिटाझेशन न करणे हे करायचे नाही, असे अजिबात नाही, असे राजेश टोपे म्हणाले.

‘या’ जिल्ह्यात कोरोना रेट वाढतोय

‘काल (सोमवारी) केंद्र सरकारची टीम राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आली होती. त्यावेळी काही जिल्ह्यांमध्ये रेट वाढत असल्याचे समोर आले. उदाहरणार्थ, अकोला, यवतमाळ, नंदुरबार, अमरावती, रत्नागिरी जिल्ह्यात रेट वाढ आहेत. त्याच दृष्टीकोनातून चर्चा केली गेली. जिथे सीएफआर म्हणजे केस फॅकल्टी रेट, स्टेट एव्हरेजपेक्षा जास्त आहे, त्या जिल्ह्याचा देखील अभ्यास केला. तर त्यामधून त्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या, त्या आमच्या विभागाने मान्य केल्या आहेत आणि आमच्या विभागाने खात्री दिली आहे की, ‘हे आम्ही करू.’ त्यामध्ये सीएफआर (केस फॅकल्टी रेट) कमी करण्यासाठी वास्तविक हा एव्हरेज रेट जास्त असला तरी विक ऑन विक जो सीएफआर रेट आहे, तो कमी आहे. पण ओव्हर ऑल जो रेट आहे तो कमी करण्यासाठी, तिथल्या डॉक्टरांना ट्रेडिंग देणे, थ्री टी प्रिन्सिपल तिथे राबवणे म्हणजेच ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीडमेंट या थ्री प्रिन्सिपल कडकपणे राबवणे. नवीन स्ट्रेनचे नमुने पुण्याच्या व्हायरोलॉजी सेंटरला पाठवणे. जिनोमिक सिक्वेन्स होतय का? याकडे लक्ष द्यायचे आहे. या सगळ्या गोष्टींकडे निरीक्षण ठेवणे, अॅनालिसिस करणे यासंदर्भातली माहिती आरोग्य विभागाने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भात निर्देश आणि सूचना दिल्या आहेत’, अशी सविस्तर माहिती राजेश टोपेंनी दिली.

पुढे टोपे म्हणाले की, ‘कोरोना काळात आम्ही प्रामाणिकपणे काम केली आहेत. सर्व संस्थांच्या निर्देशांचे पालन केले. रुग्णांना चांगल्या आरोग्यसुविधा दिल्या. पण महाराष्ट्रात सर्वात जास्त नागरीकरण असल्यामुळे कदाचित रुग्णसंख्या जास्त आहे. महाराष्ट्रापेक्षा गोवा, दिल्लीत जास्त केसेस आहेत.’


हेही वाचा – बीडमध्ये शिवसंग्रामला मेगा गळती, १५० कार्यकर्त्यांनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ


 

First Published on: February 9, 2021 3:57 PM
Exit mobile version