घरमहाराष्ट्रबीडमध्ये शिवसंग्रामला मेगा गळती, १५० कार्यकर्त्यांनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ

बीडमध्ये शिवसंग्रामला मेगा गळती, १५० कार्यकर्त्यांनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ

Subscribe

बीडमध्ये विनोद हातांगळे यांच्यासह १५० शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवसंग्रामचा मोठा नेता फोडल्याने शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे. पुन्हा एकदा काका पुतण्याच्या लढाईत शिवसंग्राम विरोधात धक्कातंत्राचा वापर करण्यात आला आहे. शिवसंग्राममधील धक्क्यामुळे बीडच्या राजकारणातील समीकरणे बदलली जातील असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. याआधीच शिवसंग्रामच्या चार नगरसेवकांनी हातावर शिवबंधन बांधले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये १५० जणांच्या प्रवेशामुळे पक्षाला एक मोठी घरघर लागलेली आहे. बीडमध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील लढाई ही सर्वश्रृत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्येही ही लढत बघायला मिळाली होती.

हल्लीच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना सपाटून मार खावा लागला होता. त्यातच काही दिवसात राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का दिला होता. येत्या दिवसातच बीड महापालिका निवडणूका लागलेल्या असतानाच आता संदीप क्षीरसागरांनी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी प्रवेश करून विनायक मेटेंना मोठा झटका दिला आहे. बीडच्या पेठ परिसरात विनोद हातांगळे यांची मोठी पकड आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने हातांगळे यांच्यासह १५० कार्यकर्त्यांच्या निमित्ताने ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसंग्रामला एक मोठी गळती गेल्या दिवसांपासून लागलेली पहायला मिळत आहे. विनायक मेटे आणि त्यांचे बंधू रामहरी मेटे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम हा पक्षातील वाढत्या गळतीच्या स्वरूपात दिसत आहे. यापुढच्या काळात शिवसंग्रामला लागलेली गळती थांबवण्याचे आव्हान हे विनायक मेटे यांच्यासमोर आहे. त्यामुळे विनोद हातांगळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -