महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी, बेळगावच्या सीमांवर पोलिसांचा बंदोबस्त

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी, बेळगावच्या सीमांवर पोलिसांचा बंदोबस्त

मुंबई – महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता विकोपाला पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालायत हे प्रकरण प्रलंबित असतानाही दोन्ही राज्यातील राजकारणासाठी हा विषय प्रतिष्ठेचा ठरला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कर्नाटकात येऊ नका अशी तंबी महाराष्ट्रातील मंत्र्यांना दिली असली तरीही हे मंत्री छुप्या मार्गाने कर्नाटकात जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवण्याकरता महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कसून तपासणी करण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या सर्व सीमांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके पोलिसांनी उभारले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील विविध तपासणी नाक्यावर तैनात करण्यात आल्या असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा – …म्हणून आजचा दौरा रद्द नसून पुढे ढकलला; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शंभूराज देसाई आणि खासदार धैर्यशील माने बेळगावात मराठी भाषिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी जाणार होते. मात्र, या दोन्ही राज्यांमधील वाद पाहता या नेत्यांनी तिथे चिथावणीखोर भाषणं केली असती तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. म्हणून महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य उत्पादक मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेत बेळगाव दौऱ्याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, “महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावमध्ये मराठी बांधवाानी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला 3 तारखेच्या ऐवजी 6 तारखेला आम्ही दोन्ही मंत्र्यांनी हजेरी लावावी, अशी विनंती त्या मराठी बांधवांनी केली होती. त्यानुसार आम्ही आमचा 6 तारखेचा दौरा निश्चित केला होता. परंतु, आमच्या जाण्यामुळे महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नय आणि आजच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी आम्ही हा बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. अद्याप आम्ही हा दौरा रद्द केलेला नाही”, असे शंभुराज देसाई म्हणाले.

First Published on: December 6, 2022 1:05 PM
Exit mobile version