घरताज्या घडामोडी...म्हणून आजचा दौरा रद्द नसून पुढे ढकलला; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण

…म्हणून आजचा दौरा रद्द नसून पुढे ढकलला; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण

Subscribe

आमच्या जाण्यामुळे महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नय आणि आजच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी आम्ही हा बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. अद्याप आम्ही हा दौरा रद्द केलेला नाही, असे स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

आमच्या जाण्यामुळे महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नय आणि आजच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी आम्ही हा बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. अद्याप आम्ही हा दौरा रद्द केलेला नाही, असे स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे बेळगाव दौरा करणार होते.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेत बेळगाव दौऱ्याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, “महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावमध्ये मराठी बांधवाानी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला 3 तारखेच्या ऐवजी 6 तारखेला आम्ही दोन्ही मंत्र्यांनी हजेरी लावावी, अशी विनंती त्या मराठी बांधवांनी केली होती. त्यानुसार आम्ही आमचा 6 तारखेचा दौरा निश्चित केला होता. परंतु, आमच्या जाण्यामुळे महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नय आणि आजच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी आम्ही हा बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. अद्याप आम्ही हा दौरा रद्द केलेला नाही”, असे शंभुराज देसाई म्हणाले.

- Advertisement -

शिवाय, “बेळगावात जायचे आणि तिकडच्या मराठी भाषिक नागरिकांना भेटायचे हे तर आम्ही करणारच. परंतु, आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये, तेथील सर्व लोकांच्या तसेच, समाजातील लोकांच्या भावनांना ठेच पोचू नये या उद्देशाने आम्ही हा दौरा पुढे ढकलला आहे”, असेही देसाईंनी यावेळी सांगितले.


हेही वाचा – तेलही गेले, तूपही गेले; शिंदे गटाला मंत्रिमंडळाबरोबर महामंडळातही कमी वाटा?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -