ईडीचा बडगा! संजय राऊतांसह ‘हे’ दोघे आहेत गजाआड, चौथा जामीनावर

ईडीचा बडगा! संजय राऊतांसह ‘हे’ दोघे आहेत गजाआड, चौथा जामीनावर

२०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून अनेक लहान-मोठ्या पक्षातील नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत चार जणांना ईडीची कारवाई झाली आहे. त्यातील छगन भूजबळ सध्या जामिनावर असून संजय राऊत यांना कालच रात्री अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – संजय राऊतांना अखेर अटक, ईडीकडून तब्बल १७ तास चौकशी

२०१९ च्या विधासनभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची नोटीस बजावण्यात आली होती. याबाबत ईडी कार्यालयात जाऊन जबाब देण्याची तयारी पवारांनी दर्शवली. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून ईडी कार्यालयात जाऊ नका अशी विनंती तत्कालीन पोलीस आयुक्तांनी पवारांना केली. तेव्हापासून पवारांवर ईडीची चौकशी झालीच नाही. याचा फायदा पवारांनाच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी झाला, असं राजकीय तज्ज्ञ सांगतात. तसेच, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सध्या ईडीच्या रडारवर असून त्यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांप्रमाणेच राज्यातील मोठे पोलीस अधिकारीही तुरुंगात आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि संजय पांडे यांच्यावर कारवाई सुरू आहे.

हेही वाचा– राऊतांच्या घरी सापडेल्या दहा लाखांच्या कॅशवर शिंदेंचे नाव?, सुनील राऊत म्हणाले…

राज ठाकरेंचीही ईडी चौकशी

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही ईडीची नोटीस बजावण्यात आली होती. ईडीने 2019 मध्ये राज ठाकरेंची तब्बल नऊ तास चौकशी केली होती. ईडीने ठाकरे यांना आयएल अँड एफएस या खाजगी वित्तीय पायाभूत सुविधा कंपनीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततांमध्ये गुंतले आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी त्यांना नोटीस बजावली होती. या नोटिसवर उत्तर देण्यासाठी राज ठाकरे ईडी कार्यायलायत गेले होते. तिथे त्यांची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर मात्र राज ठाकरे यांचा भाजप विरोध मावळला असा आरोप केला जातो.

छगन भुजबळांनी भोगला दोन वर्षे तुरुंगवास

महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ जून २०१५ मध्ये छगन भुजबळ यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी म्हणजेच १५ जून २०१५ मध्ये सक्तवसुली संचालनालयानेही (ED) भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल केले होते. दिल्लीत महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडेतेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. २० हजार पानांच्या या आरोपपत्रात ६० साक्षीदार होते. या आरोपपत्राचा आधार घेऊन सक्तवसुली संचालनालयाने करावाई केली होती. दरम्यान, १४ मार्च २०१६ मध्ये ११ तासांची मॅरेथॉन चौकशी झाल्यानंतर छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. ५ मे २०१८ मध्ये त्यांना जामीन मिळाला. सध्या ते जामिनावर सुटले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख नोव्हेंबरपासून तुरुंगात

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करचुकवेगिरी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने २ नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती. तसेच, शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणातही त्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. दरम्यान, सध्या ते आर्थर रोड तुरुगांत आहेत.

नवाब मलिकांवरही कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे माजी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचलनालयकडून २४ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. सात तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली होती. राष्ट्रीय तपास संस्थेच्या एअआयआरच्या आधारे सुरू असलेल्या तपासाअंतर्गत ही करवाई करण्यात ईली होती. तेव्हापासून नवाब मलिक आर्थर रोड तुरुंगात आहेत.

संजय राऊतांनाही केली अटक

गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने रविवारी ३१ जुलै रोजी सकाळीच संजय राऊत यांच्या घरी धाड मारून त्यांना ताब्यात घेतलं होतं. ईडी कार्यालयात तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना रात्री उशिराने अटक करण्यात आली. याप्रकरणी आता पीएमएलए कोर्टात त्यांच्यावर सुनावणी होणार आहे.

संजय पांडे सीबीआय आणि ईडीच्या कचाट्यात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनाही ईडीने अटक केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराशी (National Stock Exhachange) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. १९ जुलै रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. तसेच, १८ जुलै रोजी त्यांची सीबीआय चौकशीही झाली होती.

First Published on: August 1, 2022 9:43 AM
Exit mobile version