Omicron Variant: राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, आज ७ नव्या ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

Omicron Variant: राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, आज ७ नव्या ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

Omicron Variant: राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, आज ७ नव्या ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या रुग्णांची सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेल्या ७ रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या आता १७वर पोहोचले आहे. अजूनपर्यंत कोणत्याही रुग्णांत गंभीर ओमिक्रॉनची लक्षणे आढळली नाहीत. अशातच आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, आज राज्यात ओमिक्रॉन संसर्गाचे आणखी ७ रुग्ण आढळले आहेत. यातील ३ रुग्ण मुंबईचे तर ४ रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे.

 

आज मुंबईत आढळलेले ३ रुग्ण हे ४८, २५ आणि ३७ वर्षांचे पुरुष असून त्यांनी अनुक्रमे टान्झानिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका-नैरोबी या देशांमध्ये प्रवास केलेला आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेले ४ ही रुग्ण हे नायजेरियावरून आलेल्या ओमिक्रॉनबाधित आढळलेल्या महिलेचे येथील नातेवाईक आहेत. आज आढळलेल्या ७ रुग्णांपैकी ४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतला आहे. तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. तसेच एका रुग्णाचे वय अवघे साडे तीन वर्षे असल्याने लसीकरण झालेले नाही. ४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत तर ३ रुग्ण सौम्य स्वरुपाचे आहेत.


हेही वाचा – Omicron Variant: देशात आतापर्यंत २५ ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद; सरकारने दिला इशारा


 

First Published on: December 10, 2021 7:50 PM
Exit mobile version