भावाला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून केले कोयत्याने वार

भावाला मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून केले कोयत्याने वार

दामदुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून ठाण्यात गुंतवणूकदारांना गंडा

भावाला शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून बेदम मारहाण करत कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुर्गानगर चिंचवड येथे घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अहमद सुलतान शेख (वय-२४ रा.चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटने प्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शुभम बनसोडे, पवन लष्करे, अक्षय पासलकर, या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एटीएम फोडले!


काय आहे नेमके प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम, पवन आणि अक्षय या तिघांनी अहमद यांचा भाऊ सद्दाम याला विनाकारण शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी अहमद गेले. आरोपींनी त्यांना दुर्गानगर येथील सीएनजी पंपाच्या मागच्या बाजूला बोलवले. अहमद तिथे गेल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि लोखंडी कोयत्याने वार केले आहेत. पाठीवर, हातावर, पायावर दुखापत झाली वार करण्यात आले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

First Published on: November 19, 2019 5:27 PM
Exit mobile version