घरमहाराष्ट्रचिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एटीएम फोडले!

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एटीएम फोडले!

Subscribe

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडून ११ लाख रुपये लंपास केल्याची घटना गेल्या आठवड्यात उघड झाली होती.

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडून ११ लाख रुपये लंपास केल्याची घटना गेल्या आठवड्यात उघड झाली होती. दरम्यान, त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. एटीएममध्ये रोकड नसल्याने मोठी चोरी टळली आहे. मात्र, या घटनेची माहिती आयडीबीआय बँकेने पोलिसांना दिली नाही. त्यामुळे बँकेचा निष्काळजी पणा पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्यात अक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार घडला होता. गॅस कटर ने एटीएम फोडून त्यातील तब्बल ११ लाख रुपये चोरांनी लंपास केले होते. त्याचा तपास चिखली पोलीस घेत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी अतिरिक्त गस्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार गस्त वाढवण्यात आली होती. दरम्यान, तळवडे येथे आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. आज, मंगळवारी पहाटे पोलीस या परिसरात गस्त घालत असताना त्यांना एटीएमचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले.

- Advertisement -

ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली आहे मात्र, एटीएममध्ये रोकड नसल्याने बँकेने पोलिसांना याची माहिती दिली नाही. एक महिन्यापासून एटीएम बंद असल्याचे बँक अधिकाऱ्यानी चिखली पोलिसांना सांगितले आहे. गेल्या आठवड्यात देखील अक्सिस बँकेचे एटीएम फोडल्या नंतर बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली नव्हती. अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. त्यामुळं वारंवार बँकेचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा –

इंडस्ट्रीमधील ग्रुपीजमचा फटका मलाही बसला – श्रृती मराठे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -