‘माथेरानची राणी’ पर्यटकांसाठी पर्वणी; मरेच्या महसुलात ३३ लाखांची भर!

‘माथेरानची राणी’ पर्यटकांसाठी पर्वणी; मरेच्या महसुलात ३३ लाखांची भर!

माथेरान टॉय ट्रेन

अनलॉक होताच मुंबई महानगरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी ‘वन डे’ ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या ‘मिनी ट्रेन’मधून फिरण्यास सर्वांनी पसंती दर्शविली आहे. यातून मध्य रेल्वेच्या महसुलात ३३ लाख २६ हजारांची भर पडली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. अनेक महिने घरात कोंडून राहावे लागल्यामुळे सर्वांना बाहेरच्या ठिकाणी फिरण्याचे वेध लागले होते. त्यामुळे अनलॉक होताच मुंबई महानगरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी ‘वन डे’ ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या ‘मिनी ट्रेन’मधून फिरण्यास सर्वांनी पसंती दर्शविली आहे. यातून मध्य रेल्वेच्या महसुलात ३३ लाख २६ हजारांची भर पडली आहे.

थंडीत माथेरानला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यासह दिवाळी, नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी माथेरान गाठले होते. माथेरानमधील वेगवेगळी स्थळे बघण्यासाठी पर्यटक आतुरलेले असतात. सध्या माथेरान स्थानकापासून ते अमन लॉज मिनी ट्रेनमधून पर्यटक प्रवास करत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मिनी ट्रेनची वाहतूक बंद होती; मात्र नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन सुरू झाली. सुरुवातीला अमन लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवेच्या दिवसाला चार फेऱ्या सुरू करण्यात आल्या. दिवाळीनंतर मध्य रेल्वेने दिवसाला १२ फेऱ्या सुरू केल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या महसुलात लाखोंची भर पडली.

महिना संख्या महसूल

नोव्हेंबर – १६ हजार ९४६ प्रवासी – ११ लाख ३८ हजार १५७ रुपये

डिसेंबर – २८ हजार १८६ प्रवासी – १७ लाख ३१ हजार ५६७ रुपये

एकूण – ४५ हजार १३२ प्रवासी – २८ लाख ६९ हजार ७२४ रुपये 

वर्षाच्या सुरुवातीलाच पाच लाखांची तिजोरीत भर

माथेरान मिनी ट्रेनला नववर्षात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिनी ट्रेनमधून ७ हजार ५५७ प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर यातून ४ लाख ९१ हजार २९८ रुपयांची भर मध्य रेल्वेच्या तिजोरीत पडली आहे.

First Published on: January 12, 2021 11:08 AM
Exit mobile version