कृत्रिम तलावात बुडून दोघांचा मृत्यू

कृत्रिम तलावात बुडून दोघांचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

लोणावळ्याच्या वरसोली टोल नाक्याजवळ असलेल्या तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घडली. कचरा डेपोमधील प्रस्तावित कचरा विघटन प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी कृत्रिम तलाव बांधण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवलेले आहे. आतील परिसरात हे दोघे खेळण्यासाठी गेले तेव्हा ते कृत्रिम तलावात बुडाले आणि यात दोघांचा ही मृत्यू झाला.

खेळताना कृत्रिम तलावात पडले

घटनेतील एका मुलाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध शिवदुर्ग टीम घेत आहे. सोनु रफिक शेख (१४) असे मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव असून, दुसऱ्या मुलाचे नाव अस्लम मुजावर शेख (१६) आहे. सोनू आणि अस्लम हे दोघे जण मित्र असून कचरा वेचणाऱ्यांची मुले आहेत. ते कचरा विघटन प्रकल्पाच्या बाहेर असलेल्या जागेत राहतात. कचरा डेपोमधील प्रस्थावित विघटन प्रकल्पाचे बांधकाम सुरू असलेल्या परिसरात खेळण्यासाठी आले होते. त्याठिकाणी खेळता खेळता कृत्रिम तलावात पडले मात्र वर येण्यासाठी त्यांना जागा नव्हती, त्यामुळे त्यांचा दम लागून मृत्यू झाला आहे, असे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस दाखल झाले होते, तसेच शोध कार्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीम दाखल झाली आहे.

प्लास्टिकने केला असावा घात

दोघानांही पोहता येत असते तरी कृत्रिम तलावात वर येण्यासाठी जागा नाही. चारही बाजूंनी प्लास्टिक आहे. तसेच ती जागा निसरडी झाली आहे. त्यांचा पाण्यात दम लागून मृत्यू झाला असावा, असे तेथील स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

First Published on: June 29, 2018 10:31 AM
Exit mobile version