पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोन ताब्यात

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोन ताब्यात

माझ्या मुलीची बदनामी थांबवा, अन्यथा आत्महत्या करेन - पूजा चव्हाण वडील

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अंकुश राठोड या कार्यकर्त्याच्या नावे बनवण्यात आलेली क्लिप व्हायरल करणार्‍या व्यक्तीस त्याच्या साथीदारासह वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचा किती सहभाग आहे याची शहानिशा पोलिसांनी सुरू केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने वनमंत्री संजय राठोड यांच्या भोवती संशयाचे वातावरण निर्माण केले आहे. वनमंत्र्यांच्या नावे क्लिप तयार करून ती व्हायरल करणार्‍या दोघा इसमांचा पोलीस शोध घेत आहेत. अंकुश राठोड आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यातील कथित संभाषणातील अंकुश राठोड याचा आवाज त्याचा नसल्याचा आक्षेप अंकूशच्या आईने नोंदवला आहे. यामुळे ही क्लिप नक्की कोणी काढली, या तपासाकडेकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हे निमित्त करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यावर ज्या कोणी क्लिप व्हायरल केली त्याच्या मागावर पोलीस होते. अखेर ११ दिवसांनंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. हे दोघे कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड आहेत का? हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. आम्हाला ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहे, अशा लोकांचा आम्ही तपास करू शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले. कथित अंकुशकडील क्लिप ताब्यात घेऊन ती व्हायरल करणारी व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचे सांगितले जात होते.

पूजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेले कोणतेही पुरावे पोलिसांना सापडले नाहीत. ज्या क्लिपचा उल्लेख केला जातो त्यातही पूजाच्या केवळ नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात पूजाचे कोणतेही बोलणे क्लिपमध्ये नाही, हे लक्षात घेऊन या प्रकरणात वनमंत्र्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सेनेच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंगळवारी सेनेच्या विस्तारीत बैठकीत सांगितले.

पूजा आत्महत्या प्रकरणात नाव आलेला अरुण राठोड हा वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता आहे. तो संजय राठोड यांच्या अत्यंत जवळचा असून राठोड यांच्या सर्व खासगी गोष्टी अरुणला माहीत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. संजय राठोड यांच्या घरी, कार्यालयात आणि मंत्रालयातही अरुणचा मुक्त संचार असल्याने तो मंत्र्याचा किती जवळचा आहे.

First Published on: February 17, 2021 11:55 PM
Exit mobile version