प्रगल्भ शिक्षण व्यवस्थेसाठी मूल्यमापन, विश्लेषण महत्त्वपूर्ण – तावडे

प्रगल्भ शिक्षण व्यवस्थेसाठी मूल्यमापन, विश्लेषण महत्त्वपूर्ण – तावडे

विनोद तावडेंची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती, तावडे पुन्हा मुख्य प्रवाहात

शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार आणि काळानुरुप शिक्षणातील बदलानुसार परिपूर्ण संरचना असणे आवश्यक आहे. शिक्षण व्यवस्था प्रगल्भ करण्यासाठी नवकल्पनांचे मूल्यमापन करणे आणि त्या कल्पनांचे विश्लेषण करणे महत्त्वपूर्ण असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना तसेच कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्यांना व्यासपीठ मिळावे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात विद्यार्थी रोगमुक्त आणि सुरक्षित असावा यासाठी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बारा स्वयंसेवी संस्थाबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यावेळी ते बोलत होते.

हे सामंजस्य करार करण्यात आले

पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळेच्या मुलांसाठी मौखिक आरोग्य कार्यक्रम करणे, जीवन कौशल्य शिक्षण प्रदान करणे, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणेने इनक्युबेटरसाठी सामंजस्य करार करणे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत पाच केंद्र ग्रंथालयांचे सामाजिक आणि डिजिटल ग्रंथालयांमध्ये रुपांतरीत करणे, मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजिच्या उप कुलपतींने सेल्युलर शेतीमध्ये उत्कृष्टता केंद्र उभारणे, मीरा भाईंदर मधील महापालिका शाळांमध्ये वॉश सुविधा लागू करणे.

त्याचप्रमाणे प्रकल्पाच्या पुनरुत्थानासाठीचा उद्देश पत्र अंतर्गत ड्रॉपआउट दर कमी करण्यासाठी तसेच मुलांना शाळेत पुन्हा आणण्यासाठी प्रकल्प राबवणे. तसेच तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रम, तंत्र शिक्षण महासंचालनालयाने गोंडवाना, अमरावती आणि नागपूर या विदर्भातील विद्यापीठांमध्ये रोजगार कौशल्य प्रशिक्षण देणे, ए.एम.सी (पूर्व उपनगर) एम.सी.जी.एम ने मिशन गरीमा.ए.एम.सी (पश्चिम उपनगर) एम.सी.जी.एम ने मोबाईल वैद्यकीय युनिट्ससाठी औपचारिक भागीदारी करत अल्पसंख्यांकच्या प्रधान सचिव यांनी युवकांना कॅब ड्राईव्हर्स बनविण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणे असे एकूण बारा विविध सामंजस्य करार करण्यात आले आहेत.


हेही वाचा – स्पोटर्स सायन्स सेंटर सुरु करण्याची गरज – विनोद तावडे

हेही वाचा – पुरातन वारसा हीच आपल्या अस्मितेची ओळख – विनोद तावडे


 

First Published on: February 18, 2019 4:39 PM
Exit mobile version