घरमहाराष्ट्र'सनबर्न फेस्टिवलला' सांकृतिक खात्यातर्फे परवानगी नाही - विनोद तावडे

‘सनबर्न फेस्टिवलला’ सांकृतिक खात्यातर्फे परवानगी नाही – विनोद तावडे

Subscribe

पुणे येथे होणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यंदा आम्ही होऊ देणार नाही असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीला दिला आहे.

पुणे शहर येथे दरवर्षी ‘सनबर्न’ फेस्टिव्हचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा हे फेस्टिव्ह होऊ नये याकरता दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले होते. दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने अँड. राहुल म्हस्के आणि गिरीश गुरनानी यांनी तालुका मुळशी येथे पार पडणाऱ्या सनबर्न फेस्टिवल रदद् करण्याबाबत निवेदन दिले होते. तावडे यांनी सनबर्न फेस्टिवलला सांकृतिक खात्यातर्फे कुठल्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही असे आश्वासन दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीला देण्यात आले आहे.

‘सनबर्न’ फेस्टिव्हला सांकृतिक खात्याकडून परवानगी नाकारली

‘सनबर्न ‘ हा फेस्टिव्हल मुळशी येथे दरवर्षी ३१ चे औचित्य साधून भरवण्यात येतो. यंदा समाजविघातक सनबर्न फेस्टिव्हल २९ ते ३१ डिसेंबर रोजी बावधान येथे होणार आहे. मात्र  हा दारूड्या संस्कृतीचा आणि अमली पदार्थांचा खुला बाजार आहे. हा सरकार पुरस्कृत अश्लिल पाश्चात्य संस्कृतीचा नंगानाच आहे. त्यामुळे या फेस्टिव्हला सांकृतिक खात्यातर्फे कुठल्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आम्ही खपवून घेणार नाही. सनबर्न फेस्टिव्हलला वेळेची मर्यादा नसते. मात्र शिवजयंती, दहिहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव काळात कायद्याचा बडगा दाखवून रात्री १० वाजता बंद केले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते. त्यामुळे यंदा सनबर्न फेस्टिव्हलला होऊ देणार नाही असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीला दिला आहे.

- Advertisement -

वाचा – विद्यार्थ्यांनी सामाजिकदृष्ट्या जागृत असावे – विनोद तावडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -