घरमुंबईपुरातन वारसा हीच आपल्या अस्मितेची ओळख - विनोद तावडे

पुरातन वारसा हीच आपल्या अस्मितेची ओळख – विनोद तावडे

Subscribe

पुरातन वास्तूंची जपणूक होणे, ही काळाची गरज असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे सांगितले. मुंबई विद्यापीठाद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात तावडे यांनी हे वक्तव्य केले आहे.

आपला पुरातन इतिहास हा आपण कोण आहोत, आपण कोण होतो याचे दाखले देऊन आपल्या आपल्या अस्मितेची ओळख पटवून देतात. त्यामुळे या पुरातन वास्तूंची जपणूक होणे, ही काळाची गरज असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट व पुरातत्व विभागामार्फत एक नवीन पुरातत्व केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच हेरिटेज ऑफ मुंबई चॅलेनजीस अँड रोड अहेड हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सेमिनार मुंबई विद्यापीठामधील मराठी भाषा भवन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष ए. पी जामखेडेकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे संचालक तेजस गर्गे, पुरातत्व विभाग तसेच भित्तिचित्र अभ्यास केंद्राच्या आई. सी संचालिका मीना कातरणीकर, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, आई. सी संचालक मेधा टापीयावाला, प्रदया वारसा व्यवस्थापन सेवा केंद्राचे संचालक आनंद करनीकर आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

काय म्हणाले तावडे

यावेळी तावडे म्हणाले की,”पुरातत्व हा आजच्या काळातला सर्वात महत्त्वाचा विषय आहे, बऱ्याचदा पालकांना आणि शिक्षकांना हा विषय मुलांना कसा शिकवता येईल असा प्रश्न पडतो, अशावेळी आपले पाय जर पुरातन वास्तूकडे वळाले, तसेच या वास्तूंचे महत्त्व आपण येणाऱ्या पिढीला पटवून दिल्यास आपण येणाऱ्या पिढीसमोर या वास्तूंप्रति निष्ठा निर्माण करुन देण्यात यशस्वी होईल. मुंबईत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या प्रेक्षणीय स्थळांकडे आणि राज्यातील इतर पुरातन स्थळांच्या प्रसारासाठी राज्यात नवीन पुरातत्व केंद्र उभारून त्यासोबत रोजगार, पर्यटन वाढविण्याचा मानस आहे. तसेच पुरातन वास्तूंची जपणूक आणि संवर्धन करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. कोणत्याही विषयाचा खरेपणा न बदलता सत्य इतिहास नवीन पिढीला समजेल अशा भाषेत समजावून सांगितल्यास आपला प्राचीन इतिहास, प्राचीन कला आणि समृद्ध संस्कृतीची ओळख आजच्या पिढीला होईल.”

- Advertisement -


यावेळी पुरातन संस्कृती जपण्यासाठी काही सूचना आणि येणाऱ्या काळातील या क्षेत्रातील आवाहनां विषयी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून सुसंवाद साधला. तसेच या सेमिनार अंतर्गत पूर्ण केलेल्या रस्त्यांच्या नकाशाची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -