Vladimir Putin India Visit : भारत-रशिया मैत्रीवर चीन, अमेरिका अस्वस्थ; काय आहे कारण?

Vladimir Putin India Visit : भारत-रशिया मैत्रीवर चीन, अमेरिका अस्वस्थ; काय आहे कारण?

SOCHI, RUSSIA - MAY 21, 2018: India's Prime Minister Narendra Modi (L) and Russia's President Vladimir Putin shake hands during a meeting. Mikhail Metzel/TASS (Photo by Mikhail MetzelTASS via Getty Images)

भारतला स्वातंत्र मिळाल्यानंतर जगाच्या नकाशावर एकमेव पहिला देश म्हणजे सोव्हिएत युनियन. या देशाने ना ही भारतसोबत केवळ मैत्री केली पण ती मैत्री निर्दयीपणे निभावली. कालांतराने या देशाची विभागणी होऊन रशिया हा मोठा महासत्ताक देश बनला. आंतरराष्ट्रीय स्तरावर या देशाने अनेक चढ-उतार पाहिले मात्र रशियाने भारतसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध कधीच तुटू दिले नाही. दोन्ही देशांनी आजपर्यंत एकमेकांना मदत केली आणि आजही करत आहेत.

लष्करी क्षमतेच्या बाबतीत रशियाची गणना जगातील तीन सर्वात शक्तिशाली देशांमध्ये केली जाते, त्यामुळे कोरोना महामारीच्या काळातील रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा अनेक अर्थाने महत्वपूर्ण मानला जात आहे. यापूर्वी जून महिन्यात पुतिन यांनी जिनिव्हाला येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली होती. मात्र भारत भेटीदरम्यान पुतिन आज रिकाम्या हाताने येत नसून ते त्यांच्यासोबत अशा काही भेटवस्तू घेऊन येणार आहेत, ज्यामुळे भारत संरक्षण क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली होईल.

यामुळे चीन आणि अमेरिका अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळत आहे. चीन पुतिन यांच्या भारत दौऱ्यावर नजर ठेवून आहे, तर अमेरिके भारत आपली साथ सोडून रशियाकडे का जात असा प्रश्नात आहे. मात्र जगातील दोन महासत्ताक देशांशी समतोल साधण्यासाठी भारताकडे यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही, ज्यामुळे भारताला दोन देशांसोबतचे संबंध आणखी वाढवता येतील आणि मजबूत करता येतील.

मात्र हेही सत्य नाकारता येणार नाही की, तालिबानने जबरदस्ती अफगाणिस्तावर सत्ता काबीज केल्यानंतर भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला आहे, जो पुढील काळात आणखी वाढेल असे जगाला वाटू लागलेय. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्या मैत्रीपूर्ण भेटीने हे सर्व चुकीचे असल्याचे जगाला दाखवून दिले.

गेल्या दोन वर्षांपासून चीन भारतीय सीमारेषेवर कुरघोड्या करत आहे. त्यामुळे भारताला चीन शत्रू मानण्यास भाग पाडत आहे. परंतु ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की, चीन आणि रशियामध्येही राजकीय संबंध आहे. त्यामुळे भारत -चीन सीमारेषावरील कुरघोड्यांवर रशिया चिंतेत असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे भारत- चीनमधील हा तणाव संपवण्यासाठी पुतिन आपल्या परिने कोणता पुढाकार घेतात हे पाहावे लागेल.

आज भारत आपल्या लष्करी गरजांसाठी देखील बराच काळापासून रशियावर अवलंबून आहे. त्यामुळे पुतिन यांचा भारत दौरा काही तासांसाठी असला तरी यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक संरक्षण करार होणार आहेत. यामुळे भारताच्या सुरक्षेच्या क्षमतेत तर वाढ होईलच, पण दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आणखी भक्कम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पुतिन यांच्या या भेटीची खास गोष्ट म्हणजे ते भारताला भेट म्हणून S-400 क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा देणार आहेत. भारताने २०१८ साली रशियासोबत ५.४३ अरब डॉलरला S-400 क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा खरेदी करण्याचा करार केला होता. त्यांचे हे मॉडेल त्याच्या वितरणापूर्वी सादर करतील.

कोविड-19 महामारीमुळे भारत आणि रशियामधील वार्षिक चर्चा गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र पुतिन यांना आत्ताच्या भारत भेटीतून अमेरिकेला संदेश द्यायचा आहे, असे आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या तज्ज्ञांचे मत आहे. कारण पुतिन यांचा या वर्षातील रशियाबाहेरचा हा दुसरा विदेश दौरा आहे. जूनमध्ये पहिल्या भेटीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना भेटण्यासाठी जिनिव्हाला गेले होते. मात्र कोरोनामुळे पुतिन ना G-20 शिखर परिषदेला गेले होते ना ही ते ग्लासगो येथील हवामान परिषदेला सहभागी झाले. एवढेच नाही तर त्यांनी चीनचा प्रस्तावित दौराही याच कारणासाठी पुढे ढकलला होता. त्यामुळे पुतिन यांना भारत दौऱ्यातून केवळ भारतासोबतचे खास संबंध दृढ करायचे आहे असा असा निष्कर्ष यानिमित्ताने काढला जात आहे.

गेल्या काही वर्षांत भारताची अमेरिकेशी असलेली जवळीक वाढतच चालली आहे, हे पुतिन यांना माहीत आहे. साहजिकच रशियाला याचा आनंद आहे. त्यामुळे अशा वातावरणात पुतिन यांचे भारतात येणे महत्त्वाचे मानले जात आहे


Mahaparinirvan Din: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन; अनुयायांसाठी विशेष सुविधा, काय आहे नियमावली?


 

First Published on: December 6, 2021 8:48 AM
Exit mobile version