परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती हवीये, येथे अर्ज करा

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती हवीये, येथे अर्ज करा

प्रातिनिधिक छायाचित्र

उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत गुणवंत मुलामुलींना परेदशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विदयार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. ही योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे या नावाने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून राबविण्यात येणार आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे आणि आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्र अर्जासोबत अपलोड करणे यासाठी १५ ते ३० ऑक्टोबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत १० नोव्हेंबरपर्यंत (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) वाढविण्यात आली आहे.

ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे साक्षांकित प्रतीसोबत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी संबंधित विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण विभागाचे विभागीय कार्यालय तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी/वास्तुकलाशास्त्र आणि औषण निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी तंत्र शिक्षणचे विभागीय कार्यालय यांना १७ नोव्हेबर २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)जमा करणे आवश्यक आहे.

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; शिष्यवृत्तीसाठी येथे अर्ज करा

इच्छुक विदयार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे, आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाशिवाय इतर कोणत्याही पध्दतीने केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसोबत अर्ज संबंधित कोणत्याही विभागीय कार्यालयात मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक असणार आहे.

First Published on: November 1, 2018 10:16 PM
Exit mobile version