मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? एकनाथ शिंदे म्हणाले…

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? एकनाथ शिंदे म्हणाले…

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकाडे लागले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन पंधरा दिवस झाले तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, आज एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी पत्रकारांनी मंत्रिमंडळाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. (when is Cabinet Expansion, cm eknath shinde gives answer)

हेही वाचा – राष्ट्रपती पदासाठी रेकॉर्डब्रेक मतदान होईल, द्रौपदी मुर्मूंसाठी शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

एकनाथ शिंदे म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जे काही सांगितलं जातंय यात तथ्य नाही. आम्ही मजबुतीने आमचं सरकार चालवत असून १६५ पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत आहेत. तसेच, सत्ता स्थापन झाल्यापासून आम्ही लोकहिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

ते पुढे म्हणाले की, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने ५० रुपये देण्यात येणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला आहे. तसेच, बुस्टर डोस मोफत करण्यात आला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून सूचना दिल्या. त्यानुसार, राज्यातील सर्व लोकांना बुस्टर डोस मोफत देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा – मीरा-भाईंदरमधील शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात

दरम्यान, प्रत्येकाला फायदा मिळेल अशी यंत्रणा राबवू असाही दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. गडचिरोलीत अतिवृष्टी झाली आहे. तिथे जाऊन आम्ही आढावा घेतला आहे. तसेच, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी संपर्कात असून राज्यात कुठेही काही कमी पडू देणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारही योग्य मदत करणार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

First Published on: July 14, 2022 8:08 PM
Exit mobile version