घरताज्या घडामोडीराष्ट्रपती पदासाठी रेकॉर्डब्रेक मतदान होईल, द्रौपदी मुर्मूंसाठी शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रपती पदासाठी रेकॉर्डब्रेक मतदान होईल, द्रौपदी मुर्मूंसाठी शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

Subscribe

राष्ट्रपती पदासाठी भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. त्या आदिवासी समाजातील असून नरेंद्र मोदी यांनी त्यांना संधी दिल्याने आदिवासी समाजातील उमेदवाराला देशाच्या उच्च पदावर बसण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी यंदा रेकॉर्डब्रेक मतदान होईल, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. (Record break voting in president election says eknath shinde abour draupadi murmu)

हेही वाचा – मीरा-भाईंदरमधील शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, आदिवासी समाजाच्या महिला राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत. आदिवासी समाजाला उच्च स्तरावर बसवण्यासाठी जो निर्णय घेतला आहे, त्याचं सर्वांनीच स्वागत केलंय. काहींनी जाहीरपणे स्वागत केलंय, तर काहींनी मनापासून केलंय. त्यामुळे यावेळेस राष्ट्रपती पदासाठी रेकॉर्डब्रेक मतदान होईल, ही निवडणूक मोठ्या फरकाने आणि मताधिक्याने द्रौपदी मुर्मू जिंकतील असाही विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच, द्रौपदी मुर्मू या निवडणूक जवळपास जिंकल्या असून फक्त विजयाची औपचारकिता बाकी आहे, असंही शिंदे म्हणाले.

हेही वाचा – द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देऊनही शिवसेना दुर्लक्षितच, आजच्या मुंबईतील बैठकीचे निमंत्रण नाही

- Advertisement -

दरम्यान, शिवसेनेतील शिंदे गटाने भाजपासमवेत शिवसेनेची युती असल्याचे सांगत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे ४० आमदार आहेत. मात्र, शिवसेनेच्या खासदारांमध्ये मात्र अद्याप फूट पडलेली नाही. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून खासदार फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -