महाराष्ट्रात कोरोनावरील SARS COV- 2 या लस चाचणीचा होणार ३० माकडांवर प्रयोग!

महाराष्ट्रात कोरोनावरील SARS COV- 2 या लस चाचणीचा होणार ३० माकडांवर प्रयोग!

प्रातिनिधीक फोटो

देशासह राज्यात देखील कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू असून अद्याप कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. असे असताना अनेक देशातून कोरोना विरोधातील लस शोधण्याचे कार्य शास्त्रज्ञांकडून सुरू आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे होत असलेला संसर्ग टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे.

या संशोधनासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला ३० माकडांची आवश्यकता असून ही माकडं राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान .या चाचणीकरता ३० माकडं तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.

माकडं उपलब्ध करून देण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोनामुळे वाढत असेला कोरोना संसर्ग व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी ३० मे २०२० रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार ही माकडं तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले आहेत.

अटींचे पालन करून दिली मान्यता

तसेच वनमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार,अनुभवी माणसांमार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, यासारख्या अटींचे पालन करून ही मान्यता देण्यात आली आहे.


रोज होतेय १ लाख २० हजार कोरोनाबाधितांची टेस्ट
First Published on: June 2, 2020 7:43 PM
Exit mobile version