तुम्ही तुमची कबर खोदण्यासाठी सुरुवात केली, संजय राऊतांचा भाजपला इशारा

तुम्ही तुमची कबर खोदण्यासाठी सुरुवात केली, संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबईः मी अजिबात घाबरलो नाही, परंतु मला गंमत वाटली किती बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणा काम करत आहेत. आम्ही सगळे खंबीर आहोत. मराठी शब्दात सांगायचे झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो. बाळासाहेबांचा मराठी शिवसैनिक आहे. काय कराल डोक्यावर बंदूक लावाल ना, माझी तयारी आहे. ईडी, सीबीआय जे काही असेल हे जे भाडोत्री लोकं सोडले आहेत ते असतील संजय राऊत खोटेपणाला घाबरत नाही. तुम्ही जे खोटे कराल ते तुमच्यावर उलटवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमची कबर खोदण्यासाठी सुरुवात केली आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी ईडी कारवाईवरून भाजपला इशारा दिलाय. संजय राऊतांनी दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

कुठली पॉपर्टी आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत. 2009 साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर त्याची साधी आमच्याकडे कोणी चौकशीही केली नाही. विचारणा केली नाही. आता मी टीव्हीला पाहिलं की संपत्ती अटॅच केली. 1 रुपया जरी मनी लाँड्रिंग प्रकरणातून आमच्या खात्यात आला असेल आणि आम्ही त्यातून काही प्रॉपर्टी केली असेल तरी सगळी प्रॉपर्टी आम्ही भारतीय जनता पक्षाला दान करायला तयार आहोत, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.

2009 म्हणजे किती वर्ष झालं? अलिबागची ती जागा एक एकरही नाही. माझ्या पत्नीच्या किंवा तिच्या नात्यातील लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या छोट्या छोट्या जागा आहेत. त्यात ईडीला मनी लॉन्ड्रिंग दिसायला लागलं. राजकीय सूड आणि बदला घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊन कारवाया जातात हे पाहिलं. आमचं मुंबईतील राहतं घर जप्त केलं. भाजपचे लोक उड्या मारत आहेत. फटाके फोडत आहेत. मराठी माणसाचं हक्काचं घर जप्त केल्याबद्दल आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असंही ते म्हणालेत.


हेही वाचा ः असत्यमेव जयते; ईडीने किती उड्या मारल्या तरी तोंडावर पाडू, ED कारवाईवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

First Published on: April 5, 2022 3:20 PM
Exit mobile version