घरताज्या घडामोडीअसत्यमेव जयते; ईडीने किती उड्या मारल्या तरी तोंडावर पाडू, ED कारवाईवर संजय...

असत्यमेव जयते; ईडीने किती उड्या मारल्या तरी तोंडावर पाडू, ED कारवाईवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांचे दादरमधील राहते घर आणि अलिबागमधील ८ प्लॉट जप्त केले आहेत. संजय राऊतांचे राहतं घर जप्त करण्यात आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राऊतांविरोधातील कारवाईमुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद उफाळण्याची शक्यता आहे. दरम्यान कितीही कारवाई केली तरी संजय राऊत आणि शिवसेना घाबरणार नाही अशी स्पष्ट भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे. दरम्यान कारवाईनंतर असत्यमेव जयते असे संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. कितीही कारवाई केली तरी मी तुमच्या बापाला घाबरत नाही अशा स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. एक रुपया जरी कुठल्या गुन्हेगारी स्वरुपातील असेल आणि त्या पैशाच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी केली असेल तर ती मालमत्ता भाजप पक्षाच्या नावे करेल असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान संजय राऊत पुढे म्हणाले की, मला एक पूर्ण कल्पना होती की, ईडी माझ्या मागे लागली आहे. सीबीआय लागेल कारण ज्या पद्धतीने आम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. ज्या पद्धतीने राज्यसभा चेयरमन व्येंकैया नायडूंना पत्र लिहिले आहे. कसे ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे मदत केली नाही तर आम्ही तुमच्यावर कारवाई करुन अटक करु असे मी पत्रात म्हटलं आहे. कोणाला वाटत असेल अशा कारवाईमुळे संजय राऊत आणि शिवसेना खचली आहे असे अजिबात नाही. सूडाच्या कारवाया असत्य कारवाईपुढे कधीही गुडगे टेकणार नाही.

- Advertisement -

मी अजिबात घाबरलो नाही परंतु मला गंमत वाटली किती बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणा काम करत आहेत. आम्ही सगळे खंबीर आहोत. मराठी शब्दात सांगायचे झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो. बाळासाहेबांचा मराठी शिवसैनिक आहे. काय कराल डोक्यावर बंदूक लावाल ना, माझी तयारी आहे. ईडी, सीबीआय जे काही असेल हे जे भाडोत्री लोकं सोडले आहेत ते असतील संजय राऊत खोटेपणाला घाबरत नाही. तुम्ही जे खोटे कराल ते तुमच्यावर उलटवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमची कबर खोदण्यासाठी सुरुवात केली आहे.


हेही वाचा : संजय राऊतांचे अलिबागमधील 8 भूखंड, दादरमधील फ्लॅट जप्त, ईडीची मोठी कारवाई

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -