कौटुंबिक वादातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

कौटुंबिक वादातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे उड्डाण पुलावरून गळफास घेऊन आत्महत्येचा तरुणाचा प्रयत्न

पिंपरी चिंचवड येथे एका तरुणाने उड्डाण पुलावर साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ऐनवेळी पोलीस आल्याने मोठा अनर्थ टळला आणि तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले. आई-वडिलांना कोण सांभाळणार? यावरुन भावासोबत झालेल्या भांडणानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलले होते. निगडी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

नेमके काय घडले?

आई – वडिलांना कोण सांभाळणार? यावरुन भावा भावांमध्ये भांडणं झाली. या भांडणानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. पवन भंडारी असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याचा भाऊ विप्रो कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतो. आई वडील खेड येथे राहात असून वडील हे अपंग आहेत. त्यांना कोण सांभाळणार? यावरून दोघात जोरदार भांडण झाले. याच रागातून तरुणाने थेट पुणे-मुबंई जुना महामार्गावरील मधुकर पवळे उड्डाण पुलावर जात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी वेळीच पोलीस पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याप्रकरणी पवन भंडारी तरुणाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


वाचा – पुण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार


 

First Published on: January 14, 2019 1:20 PM
Exit mobile version