पुण्यातील हांडेवाडी रोड येथे राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा निलेश शेखर बिनावत वाचले असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निलेशवर गोळीबार करणाऱ्या गुंडाचे नाव टिपू पठाण असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या हल्ला करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नेमके काय घडले?
पुण्यातील सय्यदनगर येथे दुचाकीवरुन दोन तरुणांने बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. कुख्यात गुन्हेगाराने हांडेवाडी रोड ते हडपसर असा दुचाकीवरुन थरारक पाठलाग करत निलेश बिनावत याच्यावर गोळीबार केला. निलेशवर चार गोळ्या झाडण्यात आल्या. आपल्यावर गोळ्या झाडत असल्याचे समजताच निलेश बिनावत यांनी आपली लँड क्रुझर गाडी थेट हडपसर पोलीस ठाण्यात घेऊन गेला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार,वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.निलेश शेखर बिनवात याच्यावर कुख्यात गुंडानी पाठलाग करून केला गोळीबार.
— My Mahanagar (@mymahanagar) January 5, 2019
वाचा – बिल्डर अग्रवाल यांची आत्महत्या
वाचा – कोर्टाच्या इमारतीत बिल्डरचा गळा कापला