दूध आणि हळद हे दोन्ही पदार्थ त्वचेसाठी खूप खास मानले गेले आहेत. या दोन्हीमध्ये असलेले पोषक तत्व त्वचेशी संबंधित सर्व समस्यांवर उत्तम उपाय आहेत. तसेच हळदी आणि दुधामुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्टस चेहऱ्याला होत नाही. हळद आणि दूध नियमितपणे त्वचेवर लावल्याने त्वचेची नैसर्गिक चमक टिकून राहण्यास मदत होते.
हळद हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट कंपाऊंड आहे जे काळे डाग आणि हायपरपिग्मेंटेशन कमी करू शकते. हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि त्यात अँटी इंफ्लमेन्टरी गुणधर्म तुमच्या त्वचेला चमक देतात. तर दुधाचे एक्सफोलिएटिंग गुणधर्म आणि आवश्यक पोषक घटक त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
असा तयार करा हळदी दुधाचा फेसपॅक
- Advertisement -
- 1 चमचा दुधात २ चिमूट हळद मिसळा.
- हे तयार मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी कापूस किंवा स्वच्छ हाताने चेहऱ्यावर लावा.
- त्यानंतर बोटांनी गोलाकारपद्धतीने संपूर्ण चेहऱ्याला काही वेळ मालिश करा.
- जर मिश्रण शिल्लक असेल तर बाकी शरीराला सुद्धा लावा.
- यानंतर हे मिश्रण कोरडे होऊ द्या. तसेच हा फेस पॅक लावून तुम्ही झोपू देखील शकता.
- तसेच सकाळी तुमची त्वचा साध्या पाण्याने धुवा.
- हा फेस पॅक लावल्याने तुम्हाला याचा फरक लगेच आठवड्यात दिसून येईल.
दूध आणि हळद यांचे मिश्रण त्वचेवर नियमितपणे लावण्याचे फायदे
- मुरुमांच्या बॅक्टेरियामुळे तुमच्या त्वचेवर अनेक प्रकारचे पुरळ येऊ शकतात.
- या मुरुमांवर उपचार म्हणून दूध आणि हळद यांचे मिश्रण लावल्याने चेहऱ्यावरचे मुरुम कमी होतील.
- जरा का तुमची त्वचा तेलकट असेल तर हळदी आणि दुधाचा फेस पॅक लावल्याने चेहरा तेलकट होणार नाही.
- डोळ्याच्या खालची जागा नियमित काळी पडत असेल त्याला हे मिश्रण लावा.
- चेहऱ्यावर आलेली मुरुम काही काळा नंतर जातात पण त्याचे डाग तसेच राहतात तर त्याला सुद्धा तुम्ही हा फेसपॅक लावू शकता.
- बाहेरच्या वातावरणामुळे चेहरा काळा पडतो अशा वेळी रात्री झोपताना हळदीचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावर चमक येईल.
हेही वाचा : काकडीच्या फेस पॅकचा ‘या’ वेगवेगळ्या पद्धतीने करा वापर
- Advertisement -
- Advertisement -