Thursday, May 16, 2024
घरमानिनीBeautyपांढरे केस तोडणे पडू शकते महागात

पांढरे केस तोडणे पडू शकते महागात

Subscribe

हल्ली बदलत्या लाईफस्टाईल अनेकजण लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनुभवत आहेत. अनेकांचा तर केस पांढरे झाल्यामुळे आत्मविश्वासही कमी होतोय. यासाठी काही लोक महागडी उत्पादने वापरताहेत तर काही जण केसांना कलर सुद्धा करतात. तर काही जण केस तोडायलाही मागेपुढे पाहत नाही. जर तुम्हीही असे करत असाल तर तुमची समस्या संपण्याऐवजी वाढत जाईल. यासाठी पांढरे केस तोडल्याने काय परिणाम होतात हे समजून घेऊयात,

केस पांढरे होण्याचे कारण काय आहे?
तज्ज्ञांच्या मते,वाढत्या वयाबरोबर मेलॅनिनचे उत्पादन आणि केसांचा रंग टिकवून ठेवणारे पिगमेंट कमी होत जातात. प्रत्येक केसांच्या कूपमध्ये पिगमेंट निर्माण करणाऱ्या पेशी असतात ज्यांना मेलानोसाइट्स म्हणतात. जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे या पेशी हळूहळू कमी सक्रिय होतात. त्यामुळे मेलेनिनचे उत्पादन थांबते आणि काळे केस हळूहळू पांढरे दिसू लागतात.

White Hair Problem: लहान वयातच डोक्यावर पांढरे केस दिसायला लागलेत? हे विशेष तेल समस्या दूर करेल.

केस उपटल्याचे दुष्परिणाम

1. संसर्गाचा धोका वाढतो
केस उपटल्याने केसांचे कूप बॅक्टेरियाच्या संपर्कात येण्याची शक्यता असते. यासोबतच टाळूवर लालसरपणा आणि सूज येण्याची समस्या निर्माण होऊ लागते.

2. अंगभूत केसांचा धोका
केस उपटल्याने केसांच्या नैसर्गिक वाढीची दिशा बदलू शकते.

3. त्वचेची जळजळ होऊ शकते
केस तोडल्यामुळे त्वचेवर लालसरपणा आणि खाज येण्याची समस्या निर्माण होते. जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.

4. हायपरपिग्मेंटेशन किंवा डाग पडण्याचा धोका
जर तुम्ही तुमचे केस उपटले तर केसांच्या जागी पिगमेंटेशनच्या रूपात काळे डाग पडण्याची समस्या निर्माण होऊ लागते. त्यामुळे त्वचेवर डाग पडू लागतात. अशाने त्वचेसोबतच केसांच्या वाढीवरही परिणाम होतो.

5. केसांची असमान वाढ
केस तुटल्यामुळे, वाढ आणि टेक्श्चर दोन्हीवर त्याचा परिणाम दिसून येतो. पांढरे केस वारंवार उपटल्याने कूप कमकुवत सुद्धा होतात.

जर केस पांढरे झाले असतील तर कशी काळजी घ्याल,
केस पांढरे होण्यासोबतच त्याचा कोरडेपणाही वाढतो. अशा परिस्थितीत त्यांना मॉइश्चरायझिंग केल्याने त्यांना हायड्रेट ठेवण्यास मदत मिळेल. उन्हात बाहेर जाताना केसांना स्कार्फ किंवा टोपीने झाकून ठेवा. तसेच तुम्हाला ट्रिमिंग स्प्लिट एंड्स काढून टाकण्यास मदत करतील. यामुळे तुमच्या केसांची योग्य वाढ होईल. केस निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे आणि मिनरल्स देखील आवश्यक आहेत. त्यामुळे तुम्ही सात्विक आहार जरूर घ्या.

 

- Advertisement -

हेही वाचा ; मासिक पाळीसाठी पपई खाणं आहे फायदेशीर

- Advertisment -

Manini