Monday, April 29, 2024
घरमानिनीBeautyकेस लवकर पांढरे होण्याची कारणे

केस लवकर पांढरे होण्याची कारणे

Subscribe

अनेकांना अकाली केस पांढरे होण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे अनेकजण पांढरे केस दिसताच ते काढून टाकतात. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल तर सावध व्हा. सामान्यतः असे म्हटले जाते की, पांढरे केस उपटल्याने केस अधिक पांढरे होतात, पण त्याचे परिणाम इतकेच मर्यादित नाहीत. यामुळे तुम्हाला इतर अनेक दुष्परिणामांनंतरही सामोरे जावे लागू शकते.

पांढरे केस उपटल्याने केस अधिक पांढरे होतात?
तज्ज्ञांच्या मते, पांढरे केस उपटल्याने आसपासच्या केसांच्या कुपांवर किंवा केसांच्या रंगासाठी जबाबदार असलेल्या मेलानोसाईट्स कोणताही परिणाम होत नाही. प्रत्येक केस स्वतंत्र्यपणे कमी करतो आणि केस तोडल्याने इतर केसांवर परिणाम होत नाही. तथापि, वारंवार केस उपटण्यामुळे केसांच्या कुपांचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे केस गळतीची समस्या जाणवू शकते.

- Advertisement -

पांढऱ्या केसांची वाढ रोखण्यासाठी टिप्स

- Advertisement -

सूर्यप्रकाशपासून संरक्षण करा –
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. कुठेतरी बाहेर जाण्यापूर्वी केसांना टोपी किंवा स्कार्फने व्यवस्थित झाकायला विसरू नका.

पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स घ्या –
अँटीऑक्सीडेंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचे परिणाम कमी करते आणि केस पांढरे होणे देखील कमी करते. यासाठी ताजी फळे आणि भाज्यांसोबत ग्रीन टी, ऑलिव्ह ऑईल आणि मासे आदींचे सेवन करा.

पोषणाची कमतरता –
साधरणपणे केस पांढरे होण्याची सर्वात मोठे कारण म्हणजे पोषक तत्वांचा अभाव. जर तुम्हाला पांढरे केसांच्या समस्यपासून सुटका हवी आहे तर शरीरात पुरेसे पोषक तत्वे पोहोचतात की नाही याची खात्री करून घ्या.

पांढरे तोडण्याचे दुष्परिणाम –

संसर्गाचा धोका वाढतो – केस तोडल्याने लालसरपणा, जळजळ आणि फॉलिक्युलायटिस होण्याची शक्यत अधिक असते. तज्ज्ञांच्या मते, ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये केसांच्या कुपांचा संसर्ग होतो. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उदभवतात.

केसांची असमान वाढ – पांढरे केस उपटणे केसांच्या नैसर्गिक वाढीच्या चक्रावर परिणाम करू शकते. त्यामुळे केसांची लांबी असामान्यपणे वाढते आणि केसांचा पोतही बिघडतो.

वाढीची दिशा बदलते – पांढरे केस उपटल्याने केसांच्या नैसर्गिक वाढीची दिशा बदलू शकते.

त्वचेमध्ये जळजळ होणे – पांढरे केस उपटण्याची सवय टाळूमध्ये जळजळ, लालसरपणा, खाज सुटणे आणि जळजळ यासारख्या समस्यांना आमंत्रण देणारी ठरते. जर तुमची टाळू संवेदनशील असेल तर सावधगिरी बाळगण्याची गरज तुम्हाला आहे. त्यामुळे चुकूनही पांढरे केस मुळापासून उपटू नका.

केसांची वाढ मंदावते – पांढरे केस वारंवार उपटल्याने केसांच्या कूपांचे नुकसान होऊ शकते. परिणामी, केसांची वाढ मंदावते.

 

 


हेही वाचा : Hair Care Routine : सुंदर, सिल्की केसांसाठी ट्राय करा हे कोरियन हॅक

 

- Advertisment -

Manini