Thursday, May 16, 2024
घरमानिनीBeautyपांढरे केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय

पांढरे केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय

Subscribe

वाढत्या वयाबरोबर केस पांढरे होण्याची समस्या सामान्य बाब आहे. पण हल्ली अनेक जणांचे तरुणवयातच केस पांढरे होऊ लागलेत. बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेक जण या समस्येतून जात आहेत. अकाली केस पांढरे होणे हे आनुवंशिकतेमुळे होऊ शकते. पण, स्ट्रेस, हार्मोनल इम्बॅलन्स यामुळे देखील केस पांढरे होऊ शकतात.

5 Quick Solutions To Reverse Your Premature Grey Hair – Vedix आपल्यापैकी अनेक जण पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर डाय किंवा अन्य प्रॉडक्ट वापरत आहेत. पण हे प्रॉडक्ट नॅचरल नसल्याने केसांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. यासाठी आज आपण पाहणार आहोत असे काही घरगुती उपाय जे तुम्ही घरात करून तुमचे केस काळे करू शकता,

- Advertisement -

कढीपत्ता आणि खोबरेल तेल – कढीपत्यात ‘व्हिटॅमिन बी’ असते. जे मेलेनिन रिस्टोर करण्यात मदत करते, जे केसांना पांढरे होण्यापासून थांबवते.

कसे वापराल ?

- Advertisement -
  • सर्वात आधी कढीपत्ता स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर तो मिक्सर मध्ये वाटून घ्या.
  • बारीक केलेल्या कढीपत्त्यात खोबरेल तेल मिक्स करून घ्या.
  • तयार झालेला हेअर पॅक केसांच्या लांबीवर आणि टाळूवर लावा.
  • साधारण तासाभरानंतर केस स्वच्छ धुवून घ्या.
  • आठवड्यातून दोनवेळा हा हेअरपॅक वापरल्याने तुम्हाला फायदा होईल.

मेथी दाणे आणि मेहंदी – केवळ पांढरे केसच नाही तर कोंड्यांचीही समस्या याने दूर होते.

कसे वापराल ?

  • मेहेंदी पावडरमध्ये ४ चमचे लिंबाचा रस आणि कॉफी, २ कच्ची अंडी, एक चमचा मेथीची पूड आणि थोडे चहाच्या पानांचे पाणी मिसळून जाडसर पेस्ट बनवून घ्या.
  • ही पेस्ट केसांना लावून घ्या आणि तासाभरानंतर केस स्वच्छ धुवा.

बीटरूट हेअर डाय – नैसर्गिक रंग बनविण्यासाठी बीटरूट हेअर डाय अतिशय उपयोगी आहे.

कसे वापराल?

  • बीटरूट बारीक करून त्याचा रस काढून घ्या. त्यात कोमट खोबऱ्याचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा.
  • मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर केसांना हलक्या हातांनी मालिश करा.
  • यानंतर तासाभरानंतर केस स्वच्छ धुवून घ्या.

 


हेही वाचा ;  आठवड्यातून किती वेळा शॅम्पू करावा?

- Advertisment -

Manini