Thursday, May 16, 2024
घरमानिनीBeautyपांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी 'या' गोष्टी मिक्स करू लावा

पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी ‘या’ गोष्टी मिक्स करू लावा

Subscribe

पांढरे केस लपवण्यासाठी बाजारात मिळणारे रासायनिक रंग वापरण्याऐवजी तुम्ही मेंदी वापरू शकता. लांब आणि काळे केस चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात, पण केसांचा रंग काळ्यावरून पांढरा होऊ लागतो तेव्हा काय करावे हे कळत नाही. एक काळ असा होता की पांढरे केस म्हणजे म्हातारपण. पण आता ही व्याख्या बदलली आहे. आता केसांचा रंग लहान वयातच पांढरा होऊ लागतो. पांढरे केस अजिबात चांगले दिसत नाहीत. त्यामुळे केसाला डाई आणि केस कलरिं मोठ्या प्रमाणात हल्ली केले जातात.

डाईच्या वापरामुळे केस काळे होतात, मात्र हा रासायनिक रंग केसांसाठी अत्यंत हानिकारक असतो. जर तुम्ही कधी केसांना मेंदी लावली असेल तर मेहंदी ही केसांना नैसर्गिक रंग देण्याचे काम करते. मेहंदीची खास गोष्ट म्हणजे त्यात इतर गोष्टी मिसळून केसांना बरगंडी, लाल आणि केशरी रंग देता येतो. जर तुमचे केस राखाडी झाले असतील तर केसांना रंग देण्यासाठी मेंदीमध्ये काही गोष्टी टाकू शकता ज्यामुळे तुमच्या केसांना नॅचरल लूक मिळू शकतो.

- Advertisement -

5 easy Tips to use Henna hair pack in winter season | NewsTrack English 1

1. पांढरे केस लपवण्यासाठी मेहंदीमध्ये इंडिगो पावडर वापरा

इंडिगो पावडर केसांना रंग देण्यासाठी वापरली जाते. जर तुमचे केस पांढरे असतील तर तुम्ही या पावडरचा वापर करून ते रंगवू शकता. तसेच इंडिगो पावडर अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे केसांच्या रंगानुसार तुम्ही पावडर खरेदी करू शकता. अशाप्रकारे इंडिगो पावडर केसांना लावा.

- Advertisement -
  • सर्व प्रथम मेंदीची पेस्ट तयार करा.
  • आता एका भांड्यात पाणी आणि इंडिगो पावडर मिक्स करा.
  • ही पेस्ट मेंदीच्या पेस्टमध्ये मिसळा.
  • आता जुन्या केसांच्या ब्रशने ही पेस्ट केसांना लावा.
  • नंतर अर्ध्या तासानंतर केस चांगले धुवा.

Without Using Henna, These 3 Methods Will Get Rid Of White Hair And Make Hair Black

2. राखाडी केस लपविण्यासाठी मेहंदी फायदेशीर

फार पूर्वी पासून केसांना बहुतेकजण मेहंदी लावतात. तसेच मेंदी लावल्याने केस मऊ देखील होतात. याशिवाय केसांना नैसर्गिक रंगही येतो. जर तुमचे केस राखाडी झाले असतील तर ते लपविण्यासाठी तुम्हाला डाई वापरण्याची गरज नाही. मेंदी वापरून तुमचे पांढरे केसही रंगतील.

  • सगळ्यात आधी बाजारातून मेंदी विकत घेऊन त्याची पेस्ट बनवा.
  • आता बीटरूट सोलून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  • बीटरूटचा रस काढा.
  • आता मेंदीमध्ये हा रस टाका आणि त्याची घट्ट पेस्ट बनवा.
  • आता दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा.
  • हे करत असताना त्यात कोरफड टाका. यामुळे मेहंदी मऊ होईल.

हेही वाचा : केस कुरळे करण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

- Advertisment -

Manini