Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Beauty चेहऱ्याला कन्सीलर लावताना 'या' टिप्स करा फोलॉ

चेहऱ्याला कन्सीलर लावताना ‘या’ टिप्स करा फोलॉ

Subscribe

मेकअप मधला सर्वात महत्वाचा प्रॉडक्ट म्हणजे कन्सीलर. चेहऱ्यावरील डाग आणि डाग लपवण्यासाठी कन्सीलरचा सर्वात जास्त वापर केला जातो. ज्याशिवाय तुमचा मेकअप अपूर्ण राहतो. अशातच कन्सीलर लावणे व्यस्थित लावणे देखील खूप महत्वाचे आहे. कारण कन्सीलर जर का तुम्ही नीट लावले नाही तर तुमचा चेहरा चांगला दिसणार नाही. तसेच जरा का तुम्ही डार्क मेकअप करत असाल आणि कन्सीलर योग्यरीत्या लावले नाही तर चेहरा खराब दिसतो आणि मेकअप सुद्धा यामुळे संपूर्ण खराब होतो.

कन्सीलर हे असे प्रॉडक्ट आहे ज्यामुळे तुमची त्वचा एकसाखरी दिसते. जरा का तुमच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारचे डाग असतील किंवा तुमचा स्किनटोन एकसारखा नसेल तर तुम्ही तो सारखा करण्यासाठी कन्सीलरचा वापर करू शकता. तसेच कन्सीलरचा वापर चेहऱ्याला अतिरिक्त कव्हरेज देण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग लपविण्यासाठी केला जातो. महत्वाचे म्हणजे जर का तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे, हायपरपिग्मेंटेशन, मुरुमांचे डाग किंवा इतर डाग असतील तर हे डाग कन्सीलरमूळे पूर्णपणे लपवता येतात ज्यामुळे चेहरा सुंदर आणि एकाच टोनमध्ये दिसून येतो.

त्वचेच्या प्रकारानुसार कन्सीलर कसे निवडायचे?

- Advertisement -

Should You Apply Concealer or Foundation First?

कोणतेही मेकअप प्रोडक्ट तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार लावल्यास ते तुमच्या चेहऱ्याला चांगले फिनिश देतात. त्याचप्रमाणे, कन्सीलर देखील तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कन्सीलर विकत घेताना जो तुमचा ओरिजल स्किनटोन आहे त्याच प्रकारचा कन्सीलर निवडावा. आता जर का तुम्हाला तुमच्या स्किनटोन सारखा कन्सीलर सापडत नसेल तर डोळ्यांखालील भागापेक्षा एक किंवा दोन शेड्स हलक्या रंगाचा कन्सीलर निवडावा. यामुळे मेकअप करताना कोणत्या समस्या येणार नाहीत. तसेच जरा का तुम्हालाएकच कन्सीलर निवडताना गोंधळ होत असेल तर कोणत्याही तीन शेड्सचे कन्सीलर लावून पाहावे आणि त्यामुळे एक योग्य कन्सीलर निवडावा.

कन्सीलरचे हे तिने प्रकार तुमच्या मेकअप बॉक्समध्ये असायलाच हवेत

लिक्विड कन्सीलर

- Advertisement -

जर का तुम्हाला रोजची कन्सीलर वापराचे असेल तर तुम्ही लिक्विड कन्सीलर सहज लावू शकता. तसेच तुमचा चेहरा जास्त डल नसेल तर तुम्ही हे कन्सीलर आरामात लावू शकता. तसेच तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर हे लिक्विड कन्सीलर तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

मलई कन्सीलर

जर तुमची त्वचा सामान्य, कोरडी, संवेदनशील किंवा कॉम्बिनेशन प्रकारची असेल तर तुम्ही हे कन्सीलर वापरावे. तसेच हे कन्सीलर तुमच्या चेहऱ्याला मिडीयम आणि फुल्ल कव्हरेज देते ज्यामुळे मेकअप करत असाल तर ते छान दिसते. अशातच हे कन्सीलर तुम्ही कन्सीलर ब्रश, मेकअप ब्लेंडरने चांगले लावू शकता.

स्टिक कन्सीलर

दीर्घकाळ मेकअप तुम्हाला ठेव्याचा असेल तर तुम्ही या प्रकारचे कन्सीलर लावू शकता. तसेच हे कन्सीलर किंचितसे जाड आणि मलईदार असते. या कॅन्सिलरमध्ये पावडर मॅट फिनिशिंग असते ज्यामुळे चेहरा आकर्षक आणि तजेलदार दिसून येतो.

अशाप्रकारे कन्सीलर लावा

Your Guide to Concealers | 100% PURE

  • कन्सीलर लावताना चेहरा आधी स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्या.
  • त्यानंतर मॉइश्चरायझर आणि प्राइमरने बेस बनवावा.
  • जर का तुमची त्वचा सामान्य किंवा तेलकट असेल तर मॅट फिनिशसह हलके मॉइश्चरायझर अप्लाय करा.
  • यानंतर चेहऱ्यावरचे डाग लपवायचे असतील तर त्या जागेवर कन्सीलर लावा.
  • तसेच फाऊन्डेशन आधीच कन्सीलर लावून घ्या.
  • हे झाल्यावर कन्सीलर ब्रशने त्वचेवर कन्सीलर नीट लावून घ्या. आणि मग ब्लेंडरचा वापर करून त्याला डिप करा.
  • पावडर फाउंडेशनवर लिक्विड किंवा क्रीम कन्सीलर लावू नये कारण यामुळे चेहरा तेलकट वाटू शकतो.
  • डोळ्यांखाली कन्सीलर लावताना चमकदार फिनिश असलेले कन्सीलर वापरा.
  • ज्यामुळे डार्क सर्कल्स जास्त दिसणार नाहीत.

हेही वाचा : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला हळद मिश्रित कच्चे दूध लावल्याने मिळतील अनेक फायदे

- Advertisment -

Manini