Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र अखेर, कांदा अनुदान खात्यावर जमा व्हायला सुरुवात, नाशिक जिल्ह्यासाठी 465 कोटींचा निधी

अखेर, कांदा अनुदान खात्यावर जमा व्हायला सुरुवात, नाशिक जिल्ह्यासाठी 465 कोटींचा निधी

Subscribe

नाशिक : कांदा अनुदान थेट खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ रुपये वर्ग करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर याद्या अपलोड करण्याचे काम बुधवारी (दि.३०) उशिरापर्यंत सुरू होते. हे कामकाज विभागासह बाजार समित्यांचे सचिव आणि कर्मचार्‍यांनी केले आहे.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने शेतकर्‍यांना मदत जाहीर केली त्यानुसार ती मदत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरवातीला कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी सहकारी आणि खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक अथवा ‘नाफेड’कडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ ला विकलेल्या लेट खरीप कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने २७ मार्च २०२३ ला घेतला. क्विंटलला ३५० रुपयेप्रमाणे २०० क्विंटलपर्यंत अनुदान सरकारने जाहीर केले.

- Advertisement -

शेतकर्‍यांना दोन टप्प्यात हे अनुदान देण्यात येणार असून दुसरा हप्तादेखील लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल. योग्य खाते क्रमांक नसल्यास संबंधित शेतकर्‍यांशी संपर्क करून योग्य खाते क्रमांक घेण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकार्‍यांना केल्या आहेत. कांदा उत्पादक शेतकरी या मदतीपासून वंचित राहत असेल किंवा काही तांत्रिक अडचणी येत असल्यास शेतकर्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क करण्याचे आवाहन भुसे यांनी केले आहे.

एप्रिल महिन्यातील अनुदान 

सरकारने घोषणा केल्यानुसार ३ ते ३० एप्रिलला शेतकर्‍यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार प्रस्तावाची तपासणी सरकारी लेखापरीक्षक यांच्यातर्फे करण्यात आली. त्यानंतर आता शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -