अलीकडे अनेक महिला आपल्या त्वचेसंबंधित समस्यांचा सामना करताना दिसतात. सर्वच महिलांना आपला चेहरा नेहमी चमकदार आणि सुंदर दिसावा अशी अपेक्षा असते. यासाठी महिला बाजारातील विविध प्रोडक्ट्सचा वापर देखील करतात. मात्र, बाजारातील महागडे केमिकलयुक्त प्रोडक्ट्स काही मर्यादीत काळापर्यंतच चेहरा सुंदर ठेवण्यास मदत करतात शिवाय या प्रोडक्ट्सचा अधिक वापर चेहऱ्यासाठी घातक ठरु शकतो. अशावेळी तुम्ही घरच्या घरी तयार करता येणार केमिकलयुक्त फेसपॅक तयार करु शकता.
दही चेहऱ्यासाठी वरदान
- भारतीय संस्कृतीत दह्याला स्वतःचा इतिहास आहे. दह्याचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. दही केवळ शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये असे काही गुणधर्म आहे. ज्यामुळे तुमची त्वचा अधिक खुलून दिसते.
- Advertisement -
- चेहऱ्याची स्किन कोरडी झाली असल्यास दही एक उत्तम पर्याय आहे. दह्यामध्ये थोडेसे मध घालून त्याची पेस्ट तयार करा. हा तयार झालेला पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर धुऊन टाका. या फेसपॅकचा कोरड्या चेहऱ्यावर रामबाण उपायआहे.
- चेहऱ्यावरील डाग सौंदर्याला बादा आणतात. हे डाग दूर करण्यासाठी दह्याचा वापर करावा. दह्यामध्ये थोडीशी मुलतानी माती मिक्स करा आणि ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्याला लावा. यामुळे डाग जाण्यास मदत होते.
- तुमची स्किन संवेदनशील असल्यास दह्यासोबत केळ्याचा वापर करावा. केळी कुसकरुन त्यामध्ये दही आणि थोडेसे पाणी मिक्स करुन हा तयार झालेला फेसपॅक चेहऱ्याला लावून 20 मिनिटाने चेहरा धुऊन टाका.
- चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी दह्यामध्ये थोडेसे लिंबाचे थेंब आणि मध टाकून एकजीव करुन घेणे. हा तयार झालेला फेसपॅक चेहऱ्याला लावून सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाणयाने धुऊन घ्या. यामुळे चेहऱ्याला एक वेगळाचा ग्लो येतो.
- चेहरा टॅन झाला असल्यास दह्यामध्ये थोडेस बेसन आणि ओट्स मिक्स करा. हा तयार झालेला पॅक फेसवर लावा. यामुळे टॅन झालेली स्किन दूर होण्यास मदत होऊन चेहरा उजळतो.
- Advertisement -