चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे तुम्हाला सर्वांना माहित असतीलच. अनेकदा स्त्रिया पिंपल्स, खाज येणारे पुरळ आणि फुगलेल्या डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी बर्फ लावतात, यामुळे ही समस्या तर दूर होतेच पण चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते. पण तुम्ही कधी आईस बाऊल फेशियल ट्राय केला आहे का?
हा एक अतिशय खास प्रकारचा फेशियल आहे ज्यामध्ये कोणतेही सौंदर्य उत्पादने किंवा रसायनयुक्त उत्पादने वापरली जात नाहीत. तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर तुम्ही हे फेशियल करून पाहू शकता. घरी ice बाऊल फेशियल कसे करावे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
- Advertisement -
चमकदार त्वचेसाठी ice बाउल फेशियल कसे करावे
- सर्वप्रथम, तुम्हाला एक मोठी वाटी घ्यावी लागेल तसेच हि वाटी संपूर्ण चेहऱ्याला बसेल एवढी मोठी असावी.
- आता बर्फ वितळण्यासाठी काही मिनिटे थांबा आणि भांड्यात साधे पाणी भरा.
- आता या भांड्यात तुमचा चेहरा 2 ते 3 सेकंद बुडवून ठेवा आणि नंतर बाहेर काढा.
- हे सतत तुम्ही हे चार ते पाच वेळा पुन्हा करा.
Ice बाउल फेशियलचे ‘असे’ मिळतील फायदे असे मिळतील याचे फायदे
- ice बाऊल फेशियल चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास मदत करते.
- यामुळे डोळ्यांना सूज येण्याची समस्याही कमी होते.
- कमी झोपेमुळे अनेक वेळा डार्क सर्कलची समस्या उद्भवते.
- अशावेळी हे फेशियल डार्क सर्कलपासून आराम मिळवण्याचा उत्तम उपाय आहे.
- ice फेशियलमूळे चेहरा चांगला राहतो. तसेच त्यामुळे चेहऱ्याची पोत सुधारते. डेड स्किन सुद्धा निघून जाते.
हेही वाचा : दर पंधरा दिवसांनी का करावे फेशियल?
- Advertisement -
- Advertisement -