आजकाल केस गळण्याची समस्या वाढत आहे. तसेच तरुणांमध्ये ही समस्या मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकता. यामध्ये अयोग्य आहार, ताण,तणाव हार्मोनल असंतुलन देखील याचे कारण असू शकते. तुमचे केस सतत गळत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वेळीच त्याकडे लक्ष द्या. काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे तुमचे केस गळणे कमी होईल.
केस गळण्याचे कारण
- शरीरात मोठ्याप्रमाणात हार्मोन्सचे बदल होताना पाहायला मिळतात.
- चुकीचा आहार, अनियमित झोप , शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे आरोग्याच्या समस्या तर उद्भवतात.
- पण यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य बिघडते.
- हार्मोनल असंतुलनामुळे महिलांना केस गळण्याची समस्या आयुष्यभर भेडसावत असते.
- गर्भधारणा, बाळंतपण, मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती इत्यादी कारणांमुळे महिलांच्या शरीरातील हार्मोनल पातळीमध्ये अनेकदा असंतुलन होते.
- इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, DHEA हे काही हार्मोन्स आहेत जे केसांची वाढ थांबवतात.
केस वाढीसाठी प्या दालचिनीचे पेय
केसवाढीसाठी नियमितपणे दालचिनीचे पेय जर का तुम्ही पियालात तर तुमच्या आरोग्यसाठी अतिशय उपयुक्त तर आहेच. याचबरोबर जर का आठवड्यातून दोन वेळा तुम्ही दालचिनीचे पेय पियालात तर यामुळे शरीराला थंडावा मिळेल आणि हा थंडावा केस वाढीसाठी खूप गरजेचा आहे. अशातच केस वाढीसाठी दालचिनी गुणकारी मानली जाते.
- Advertisement -
साहित्य
- दालचिनी – 1 चिमूटभर
- मेथी दाणे – 1/4 टीस्पून
- ग्रीन टी बॅग – 1
- पाणी – 200 मि.ली
कृती
- मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा.
- एक पॅन घ्या. पॅनमध्ये पाणी घाला आणि उकळवा.
- आता त्यात दालचिनी आणि मेथीचे दाणे टाका.
- हे करत असताना दालचिनी अर्धी होईपर्यंत उकळवा.
- मग दालचिनी फिल्टर करा.
- यामध्ये ग्रीन टी पिशवी घाला आणि 5 मिनिटे यामध्ये ती घालून ठेवा.
- आता तुमचे पेय तयार आहे.
दालचिनी पेय पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे
- हे पेय प्यायल्याने शरीरातील इन्सुलिन लेवल सुधारते.
- तसेच मेथीच्या दाण्यांमध्ये अमिनो अॅसिड असतात, जे पेशींद्वारे आपल्या शरीरात ग्लुकोजचे शोषण वाढवतात.
- दालचिनीमध्ये सिनामल्डीहाइड असते. ते पेशींमध्ये ग्लुकोज पोहोचवण्यास देखील मदत करते.
- अशातच जर का दालचिनीमध्ये तुम्ही ग्रीन टी ग्लुकोज मिक्स करून प्यायलात तर पचनसंस्था सुधारते.
हेही वाचा :
Oily Hair च्या समस्येपासून दूर राहण्यासाठी ‘हे’ फूड्स खाणे टाळा
- Advertisement -
- Advertisement -