घरक्राइमचारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाने केली आईची हत्या, वसईतील घटनेने खबळबळ

चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाने केली आईची हत्या, वसईतील घटनेने खबळबळ

Subscribe

वसई : पालघरमध्ये बदली ड्रायव्हर आसिफ घाची याच्या हत्येची चर्चा सुरू असतानाच वसईमध्ये एका महिलेच्या हत्यने खळबळ उडाली आहे. चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलानेच मातेची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्या मुलाला अटक केली आहे.

हेही वाचा – …ही मोदी सरकारची खरी भीती आहे, कांदा निर्यात शुल्कवाढीवरून ठाकरे गटाचा निशाणा

- Advertisement -

सुनीता घोगरा असे या मृताचे नाव असून मागीलवर्षी झालेल्या निवडणुकीत 36 वर्षीय सुनीता घोगरा वसई पूर्वेतील देपिवली ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. आपली आई सतत कोणाशी तरी फोनवर बोलत असते, तिचे कोणाशी तरी संबंध असावे, असा संशय त्यांच्या 17 वर्षीय मुलाला होता.

सुनीता या वालीव परिसरातील एका कारखान्यात नोकरीला होत्या. रविवारी सुट्टी असल्याने त्या घरातच होती. रात्रीचे जेवण झाल्यावर त्या आपल्या खोलीत झोपायला गेल्या असता, त्यांच्या मुलाने झोपलेल्या आईवर कुऱ्हाडीचे तीन घाव घातले आणि नंतर गळाही चिरला. त्यानंतर तो घराबाहेर पळून गेला. सुनीता यांचा पती रात्री उशिरा घरी परत आल्यावर त्याने आपल्या पत्नीला जखमी अवस्थेत बघितले. त्याने लगेचच तिला उपचारांसाठी भिवंडी येथे नेले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

- Advertisement -

हेही वाचा – COVID लसीकरणाचा नेमका परिणाम काय? वाचा इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चची माहिती…

सुनीता यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर मांडवी पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविली. पोलिसांनी तिच्या पतीला व मुलाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यात मुलाने, मीच आईची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, असे मांडवी पोलिस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले.

बदली ड्रायव्हरच्या हत्येचे प्रकरण
पालघरमध्ये बदली ड्रायव्हर आसिफ घाची याच्या हत्याप्रकरणात तीन आरोपींपैकी दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. धर्मानंद उमाकांत जाल (वय – 24), सेसवा ऊर्फ प्रीतम सांता मेहर (वय – 25) अशी त्यांची नावे असून तिसरा मारेकरी खुशीराम राजू डोलामणी हा फरार आहे. गाडी चोरीन ती ओडिशा राज्यात भाडेतत्वावर चालवण्याचा प्लान या तिघांचा होता. पण त्याचबरोबर गाडी चोरल्याचा कुठलाही पुरावा राहू नये, म्हणून ड्रायव्हर आसिफ घाची याचा खून केल्याची माहिती अटकेतील दोघांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -