Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Beauty Dark circle ने त्रस्त आहात मग करा 'हे' उपाय

Dark circle ने त्रस्त आहात मग करा ‘हे’ उपाय

Subscribe

थकवा, झोप न लागणे, ताणतणाव, वाढत्या वयामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. अशातच महिला काळी वर्तुळे लपवण्यासाठी मेकअपचा वापर करतात. अशातच मेकअपऐवजी काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय देखील आहेत. ज्यामुळे डोळ्या खालची काळे वर्तुळे कमी होतात. आणि चेहरा चांगला दिसतो. अशातच आता आपण काही सोपे घरगुती उपाय पाहणार आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही डोळ्यांखालील काळी वर्तुळे सहज दूर करू शकता.

How To Refresh Puffy And Discoloured Under Eye Area

डार्क सर्कला लावा थंड दूध 

- Advertisement -

दुधाचा वापर प्रत्येक घरात होतो. तसेच काळी वर्तुळे दूर करण्यासाठी थंड दूध वापरता येते. एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात कापसाचा गोळा भिजवा. यानंतर डोळ्यांखालील काळी वर्तुळे असतील त्याला हे लावा. हे कापसाचे बोळे 20 मिनिटे डोळ्यांवर राहू द्या. नंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. जर तुम्ही ही प्रक्रिया नियमितपणे सकाळी आणि रात्री केली तर तुम्हाला लवकरच परिणाम दिसून येईल.

गुलाब पाणी आणि दूध

थंड दूध आणि गुलाबजल समान प्रमाणात मिक्स करून घ्या. तसेच या मिश्रणात २ कापसाचे गोळे भिजवा. हे आता डोळ्यांच्या खालच्या बाजूला ठेवून द्या. तसेच त्यांना 20 मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. अशातच डार्क सर्कल्स काढून टाकण्यासाठी, ही प्रक्रिया आठवड्यातून 3 वेळा करा. ज्यामुळे डोळे शांत राहतील. तसेच डोळ्यांचा खालचा भजग दीर्घकाळ काळा राहणार नाही.

बदाम तेल आणि दूध

- Advertisement -

थंड दुधात बदामाचे तेल समान प्रमाणात मिक्स करून घ्या. आता यामध्ये २ कापसाचे गोळे बुडवा. कापसाचे बोळ्यात हे मिश्रण बुडवून घ्या. या नंतर 15-20 मिनिटे हे मिश्रण डोळ्यांवर ठेवा. हे करून झाल्यावर डोळे ताज्या पाण्याने धुवा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल आणि डोळ्यांची उष्णता वाढली असेल ती कमी होईल.

टोमॅटोचा रस

डार्क सर्कलपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही टोमॅटोचीही मदत घेऊ शकता. यासाठी टोमॅटोच्या बिया काढून त्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि फ्रीजमध्ये थंड होऊ द्या. हे मिश्रण थंड झाल्यावर डोळ्यांच्या काळ्या वर्तुळांवर लावा. यानंतर अर्ध्या तास झाल्यावर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. जर का तुम्ही रोज असे केले तर डोळ्यांची काळी वर्तुळे कमी होतील.

बटाट्याचा रस

बटाट्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यासही मदत होते. बटाटा किसून त्याचा रस काढा. नंतर बटाट्याच्या रसात थोडा कापूस पूर्णपणे भिजवून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांची खालची स्किन सुधारेल. तसेच काली वर्तुळे कमी होतील. त्यामुळे छान झोप सुद्धा लागेल.

संत्र्याचा रस

संत्र्याच्या रसात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळा आणि हे मिश्रण डोळ्यांच्या ब्लॅकहेड्सवर लावा. यामुळे काळी वर्तुळे तर कमी होतीलच पण डोळ्यांना यामुळे चमकही येईल.

काकडी

काकडीचा थेट संबंध डोळ्यांच्या आरोग्याशी असतो. यासाठी काकडी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी आणि नंतर त्याचे तुकडे करून ते डोळ्यांवर ठेवावे. हे काप डोळ्यांवर 10 मिनिटे ठेवा आणि नंतर डोळे धुवा. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि काही दिवसात काळी वर्तुळे कमी होऊ लागतील.

पुदिन्याची पाने

पुदिन्याचा वापर काळ्या वर्तुळांवरही केला जातो. पुदिन्याची काही पाने बारीक करून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट काळ्या वर्तुळांवर लावा. तसेच ही पेस्ट 10 मिनिटे डोळ्यांवर ठेवल्यानंतर थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. हे पाणी रोज रात्री लावल्यास आठवडाभरात तुम्हाला फरक दिसेल.

मध आणि लिंबू

1 चमचा कच्च्या दुधात लिंबाचा रस मिसळा. हे केल्यामुळे दूधाचे दही होईल. आता हे झाल्यावर त्यात १ चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण डोळ्यांना लावून काही वेळ मसाज करा. त्यानंतर हे लावलेले मिश्रण 10 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. तसेच हे केल्यामुळे डोळयांचे तेज वाढेल आणि डोळ्यांना आराम मिळेल.

अशा प्रकारे जर का तुम्ही हे घरगुती उपाय करून तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य परत मिळवू शकता. त्यामुळे हे उपाय न चुकता आठवड्यातून एकदा तरी करून बघाच…


हेही वाचा :

फंक्शनला जाण्यापूर्वी आणि नंतर अशी घ्या त्वचेची काळजी

- Advertisment -

Manini