Tuesday, May 7, 2024
घरमानिनीBeautyफंक्शनला जाण्यापूर्वी आणि नंतर अशी घ्या त्वचेची काळजी

फंक्शनला जाण्यापूर्वी आणि नंतर अशी घ्या त्वचेची काळजी

Subscribe

स्किन केअर रुटीन व्यवस्थित असेल तर त्वचा ही उत्तम राहते. त्वचेचा टेक्सचर ही व्यवस्थित राहतो आणि चेहऱ्यावर ग्लो सुद्धा येतो. कोणत्याही पार्टीला अथवा फंक्शनला जाण्यापूर्वी स्किन केअर केल्यास मेकअप ही व्यवस्थित राहतो. अशाच प्रकारे पार्टीवरुन आल्यानंतर मेकअप काढल्यानंतर ही स्किन केअर करणे फार महत्त्वाचे असते. स्किन केअर केली नाही तर चेहऱ्यावर डार्क स्पॉट येऊ लागतात. अशातच योग्य मेकअप रुटीन आणि स्किन केअर करणे फार महत्त्वाचे आहे. पार्टीला जाण्यापूर्वी आणि नंतर कशा प्रकारे त्वचेची काळजी घ्यावी याच बद्दल अधिक जाणून घेऊयात. (skin care tips)

पार्टीला जाण्यापूर्वी
एखाद्या फंक्शनला जाण्याचा विचार करत असाल तर सर्वात प्रथम त्वचेला स्वच्छ करा. यासाठी तुम्ही तुमच्या स्किन टाइपनुसार फेस वॉश निवडा. चेहरा धुतल्यानंतर तो टॉवेलने पुसण्याऐवजी एखाद्या स्वच्छ कपडाने चेहरा सुकवा.

- Advertisement -

दुसरी स्टेप अशी की, चेहऱ्याला मॉइश्चराइजर लावा. मॉइश्चराइजर लावण्यापूर्वी सीरमचा सुद्धा वापर करू शकता. मॉइश्चराइजर लावल्यानंतर सनस्क्रिन लावणे अजिबात विसरु नका. अशा प्रकारे तुमची स्किन मेकअपसाठी तयार होईल.

- Advertisement -

पार्टीवरुन आल्यानंतर
पार्टीवरुन आल्यानंतर सर्वात प्रथम मेकअप काढा. जर तुमच्याकडे मेकअप रिमूवर नसेल तर तुम्ही नारळाचे तेल किंवा शिया बटरच्या मदतीने तो काढू शकता. यानंतर चेहरा स्वच्छ करा. फेस वॉश लावून हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा. आता चेहऱ्याला स्क्रब लावा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.

पुढील स्टेप अशी की, चेहरा जेव्हा हलका ओलसर असेल तेव्हाच मॉइश्चराइजर लावा. मॉइश्चराइजर लावून चेहऱ्यावर तुम्ही सीरम लावू शकता.


हेही वाचा- ‘या’ ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये असतात केमिकल्स, वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

- Advertisment -

Manini