त्वचा तजेलदार दिसण्यासाठी हल्ली सर्वजण विविध प्रकारच्या सौंदर्य उत्पादने किंवा सौंदर्य उपचारांचा वापर
करतात. पण त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे हे कधीही उत्तम मानले जाते. तसेच नैसर्गिक प्रॉडक्ट्सचा त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. तर कालांतराने त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते.
तसेच तुम्हाला पैसा खर्च न करता नैसर्गिकरित्या चमकणारी त्वचा मिळवायची असेल. तर संत्र्याच्या मदतीने आइस क्यूब बनवता येतात. संत्र्यात असलेले व्हिटॅमिन सी तुमची त्वचा उजळ आणि नितळ करण्यास मदत करतात. तर आता आपण ऑरेंज आइस क्यूबचे फायदे आणि हा आइस क्यूब कसा वापरावा हे पाहणार आहोत. ऑरेंज आइस क्यूब घरच्या घरी कसा बनवावा जाणून घेऊया साहित्य आणि कृती…
- Advertisement -
साहित्य
- संत्र्याच्या सालीची पावडर – 1 टीस्पून
- पाणी – 1 ग्लास
- एलोवेरा जेल- 1 टीस्पून
- बर्फाचा ट्रे
असा बनवा ऑरेंज आइस क्यूब
- ऑरेंज आइस क्यूब बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घ्या आणि ते 2 मिनिटे उकळवा.
- नंतर गॅस बंद करा आणि त्यात एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घाला.
- आता हे पाणी झाकणाने झाकून ठेवा आणि10 मिनिटे तसेच ठेवा.
- हे झाल्यावर ते पाणी गाळून त्यात एक चमचा एलोवेरा जेल टाका आणि चांगले मिक्स करा.
- यानंतर चमच्या साह्याने बर्फाच्या ट्रेमध्ये हे मिश्रण भरा आणि 4-5 तास फ्रीज मध्ये ठेऊन द्या.
ऑरेंज आइस क्यूब्सचे फायदे
- संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी तुमची त्वचा उजळण्यास मदत करते.
- ऑरेंज आइस क्यूब त्वचेवर लावल्यास त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो.
- ऑरेंज आइस क्यूब तुमची त्वचा घट्ट करतात. तसेच चेहऱ्यावर असलेले छिद्र या आइस क्यूब मुळे कमी होतात.
- ज्यामुळे तुमची त्वचा अधिक सुंदर दिसते.
- महत्वाचे म्हणजे ऑरेंज आइस क्यूब तुमच्या त्वचेची सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.
- कारण यामुळे त्यामुळे त्वचा अधिक ग्लोइंग दिसते.
- तसेच ऑरेंज आइस क्यूबने त्वचेवर मसाज केल्यावर चेहऱ्यावर रक्ताभिसरण चांगले होते.
- ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते.
- ऑरेंज आइस क्यूब तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
- ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर तर दिसतेच आणि यासोबतच फ्रेश सुद्धा दिसते.