Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई skin care : उन्हामुळे चेहरा काळा झाला का ? 'या'...

skin care : उन्हामुळे चेहरा काळा झाला का ? ‘या’ टिप्स करा फॉलो

Subscribe

हल्ली प्रत्येकाला ग्लोइंग आणि डाग नसलेली त्वचा हवी असते. अशातच ब्यूटी ट्रिटमेंट ते महागड्या क्रिम पावडरपर्यंत सगळ्याचा वापर केला जातो. अशा परिस्थिती हे डाग चेहऱ्यावर नक्की कुठे आहेत, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. अनेकदा नाकावर किंवा कपाळावर गडद डाग असतात. अनेकांना वाटतं की, हे डाग कडक उन्हामुळे असल्याचा सगळ्यांचा अंदाज असतो.

तसेच कपाळावरील काळे डाग ही समस्या अनेक लोकांमध्ये सामान्य आहे. उन्हातून घराबाहेर पडताना आपण चेहरा कव्हर करतो. मात्र काही भाग कव्हर करता येत नाही. यामध्ये कपाळाचा भाग जास्त असतो. या भागाला अधिक ऊन लागल्यामुळे काळेडाग पडतात. आणि हे डाग वर्षानुवर्षे तसेच राहतात. यासाठी कपाळाच्या त्वचेची काळजी अशी घ्या.

- Advertisement -

Forehead Wrinkles: 7 Ways to Get Rid of and Prevent Them

 

- Advertisement -

अशी घ्या कपाळाच्या स्किनची काळजी-

  • कपाळाची त्वचा चेहऱ्याप्रमाणेच सॉफ्ट असते. मात्र ती सतत घर्षण झाल्यामुळे काळी होते.
  • इंसुलिनच्या समस्येमुळे देखील डोक्याला काळेडाग पडतात.
  • कपाळ काळसर होण्याच्या या सर्व कारणांकडे दुर्लक्ष करू नका. त्वचेची काळजी नीट घ्या.
  • कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाणे टाळा. जर तुम्ही बाहेर गेलात तर कपाळ चांगले झाकून बाहेर जा.
  • चेहऱ्याच्या सर्व भागांवर तसेच कपाळावर सनस्क्रीन लावायला विसरू नका.
  • उन्हाळ्यात कपाळाला खूप घाम येतो, म्हणून तो पुसण्यासाठी नेहमी मऊ रुमाल वापरा.
  • इन्सुलिन रेझिस्टन्समुळेही कपाळावर काळेपणा येतो. अशा वेळी एकदा इन्सुलिनची पातळी तपासा.

हेही वाचा : Skin care : बजेट फ्री असलेले ‘हे’ 5 बेस्ट फेस पॅक ; नक्की ट्राय करा

- Advertisment -