Thursday, December 7, 2023
घरमानिनीBeautyग्लोईंग त्वचेसाठी टोमॅटो फेसपॅक उपयुक्त

ग्लोईंग त्वचेसाठी टोमॅटो फेसपॅक उपयुक्त

Subscribe

भाज्यांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला टोमॅटो जेवणात आणि सुंदर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. टोमॅटोपासून चमकदार त्वचा मिळविण्यासाठी, तुम्हाला फक्त एक टोमॅटो आणि एक चमचा साखर आवश्यक आहे. अर्ध्या टोमॅटोवर थोडीशी साखर घाला आणि मग गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळा. हे करत असताना एवढे लक्षात ठेवा की टोमॅटो फक्त गालावर,हनुवटी आणि नाकाच्या भागाजवळ मसाज करणे आवश्यक आहे.

तसेच जर का तुम्ही टोमॅटो या भागावर लावलात तर तुम्हाला ब्लॅकहेड्सची समस्या येणार नाही. तसेच टोमॅटोमध्ये असलेले अॅसिड आणि साखर तुमच्या चेहऱ्याला चांगले एक्सफोलिएट करातात. अशातच जर का तुम्ही टोमॅटो सर्कुलर मोशनमध्ये चेहऱ्याला लावा,आणि मग काही वेळ तसाच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने तुमच्या त्वचेतील मृत पेशी निघून जातील. तसेच ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या दूर होईल.

- Advertisement -

Want Glowing & Flawless Skin? Try These 5 Tomato Face Packs-Want ...

असा बनवा टोमॅटो फेसपॅक

  • हा पॅक बनवण्यासाठी एक चमचा टोमॅटोचा पल्प काढा.
  • त्यात दोन चमचे दही घालून मिक्स करा.
  • आता तुमचा चेहरा स्वच्छ करा आणि ही गुळगुळीत पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा.
  • हा मास्क सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
  • या मास्कमुळे तुमची त्वचा हायड्रेट होईल, तसेच त्वचेवर नैसर्गिक चमक येईल आणि पिगमेंटेशनची समस्या देखील दूर होईल.
  • अशातच काही लोकांना टोमॅटोची ऍलर्जी असू शकते, त्यामुळे टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी स्किन पॅच टेस्ट करून घ्या.

हेही वाचा : स्किन चिरतरुण दिसण्यासाठी खा भोपळा

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -

Manini