Monday, October 2, 2023
घर मानिनी Beauty 'या' ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये असतात केमिकल्स, वापरण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या

‘या’ ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये असतात केमिकल्स, वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Subscribe

मेकअप इंडस्ट्री ही मोठ्याप्रमाणात आपला उद्योग चालवत असते. मेकअप शिवाय जगणे हे अतिशय कठीण झाले आहे. अशातच मेकअप हा प्रचंड मोठा आणि तेवढाच प्रसिद्ध असा हा उद्योग आहे. ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी दररोज नवीन कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स लाँच केली जातात. आपण जेव्हा मेकअप करतो तेव्हा आपल्याला समजत नाही की आपण कसे आणि कोणते प्रॉडक्ट्स वापरत आहोत. हल्ली केमिकल युक्त प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये सहज विकले जातात. ते पण स्वस्त किंमतीमध्ये मिळतात ज्यामुळे अनेक लोक हे घेतात. आणि यामुळे त्यांना अशा प्रकारचे हानिकारक दुष्परिणाम पाहायला मिळतात.

Makeup Products Expiry Date - When To Throw Away Your Makeup Products |  VOGUE India | Vogue India

1. वाटरप्रूफ मस्कारा (Waterproof mascara)

- Advertisement -

कमी दर्जाच्या वाटरप्रूफ मस्कारामुळे डोळ्यांना इजा पोचू शकते. तसेच दिवसभर आयमेकअप केल्याने डोळ्यांना खाज आणि सूज अगदी सर्रास येऊ शकते. वॉटरप्रूफ मस्कारामध्ये सिलिकॉन नावाचा एक घटक असतो. ज्यामुळे डोळ्यांना झळझळ होवू शकते. अशातच डोळ्यांना वाटरप्रूफ मस्कारा लावताना मस्कारा तो कोणत्या कंपनीचा आहे आणि यामध्ये असलेले घटक हे आपल्या डोळ्यांना त्रास देवू शकतील का ? हे एकदा तपासून पहा. मस्कारा काढताना चांगल्या प्रकारचा रिमूव्हर वापरा. कारण मस्कारा मध्ये असलेले बारीक पार्टिकल्स डोळ्यांना जड करतात. यामुळे डोळे हेवी होतात.

2. ड्राय शॅम्पू (Dry Shampoo)

ड्राय शॅम्पू हे असे प्रॉडक्ट आहे. ज्याद्वारे तुमचे केस पाण्याशिवायही स्वच्छ करता येतात. हा शॅम्पू पावडरच्या स्वरूपात असतो. तसेच ड्राय शाम्पूला हायब्रीड शॅम्पू असेही म्हणतात. हा शॅम्पू लिक्विड प्रमाणे काम करतो. तसेच हा शॅम्पू पाण्याशिवाय आपले केस स्वच्छ करतो. तसेच या शॅम्पूमुळे केसांमधील सर्व चिकटपणा निघून जातो. तसेच ड्राय शॅम्पू हा पावडर स्वरूपात असतो. पण ड्राय शॅम्पू हा जास्त प्रमाणात वापरल्यास याचे साईड इफेक्ट्स आपल्या केसांवर जास्त प्रमाणात दिसून येतो. ड्राय शॅम्पूचे अनेक फायदे असले तरी त्याचा जास्त वापर केल्याने अनेक समस्याही यामुळे निर्माण होऊ शकतात. अशातच याचा जास्त वापर केल्याने तुमच्या टाळूवर याचे घटक तसेच राहून जातात. ज्यामुळे केसांची वाढ खुंटते. त्यामुळे केस धुण्यासाठी ड्राय शॅम्पू गरज असल्यास वापरावा.

3. केस सरळ करणारी केमिकल मशीन (Chemically hair straightening)

- Advertisement -

केस सरळ करणाऱ्या केमिकल मशीनमुळे शरीराला अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. या मध्ये असलेले रसायन गर्भाशयाच्या पिशवीला धोका पोहचवू शकतात. यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. तसेच यामुळे डिम्बग्रंथि आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो. कारण, त्यात पॅराबेन्स बिस्फेनॉल ए आणि फॉर्मल्डिहाइड सारखी धोकादायक रसायने असतात आणि ती थेट आपल्या टाळूच्या आतमध्ये जावून आपल्या संपूर्ण शरीराला धोका पोहचवू शकतात.


हेही वाचा

महिलांमध्ये Facial Hair येण्याची ‘ही’ आहेत कारणे

- Advertisment -

Manini