Tuesday, May 14, 2024
घरमानिनीBeauty'या' गोष्टीमुळे केस अकाली होतात पांढरे

‘या’ गोष्टीमुळे केस अकाली होतात पांढरे

Subscribe

आज काल पांढऱ्या केसांच्या समस्या ही एक सामान्य बाब झाली आहे. आताच्या काळात कमी वयात मुला-मुलींमध्ये केस पांढरे होण्याची समस्याचा सामना करावा लागतो.

तुम्ही वयाच्या आधी म्हातारेपण आले असे मानले जाते. पण, तुम्ही कधी असा विचार केला की, कमी वयात केस पांढरे होण्यामागचे नेमके काय कारण आहे. कोणत्या चुकांमुळे तुमचे केस पांढरे होऊ लागेल आहेत.

- Advertisement -

तुमच्या शरीरात पित्त दोष असेल, तर तुमचे केस पांढरे होण्याची समस्या दिसून येते, असे आयुर्वेदात म्हटले आहे. पण, काही कारणे हे तुमच्या चुकांमुळे पांढरे केस होतात.

- Advertisement -

हेअर कलरचा वापर

तुमच्या केसात 1-2 पांढरे केस दिसले, तर तुम्ही केसांना कलर करणे सुरू करतात. हेअर कलरमुळे तुमचे केस जास्त पांढरे होऊ लगातात.

वेगवेगळे प्रॉडक्ट्सचा वापर

तुम्ही केस सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रॉडक्ट वापरतात. यासाठी तुम्ही वेगवेगळे शैंपू-कंडीशनर आणि हेअर प्रॉडक्ट्स वापरता. हे प्रॉड्क्टस तुमच्या केसांसाठी योग्य नाहीत. यामुळे सुद्धा तुमचे केस लवकर पांढरे होतात.

गरम पाण्यांनी केस धुवू नये

जास्त गरम पाण्यांनी केस धुतल्याने ते कमजोर होतात. यामुळे तुमचे केस कोरडे आणि निस्तेज होतात. जास्त गरम पाण्याने केस धुतल्याने तुमच्या केसांचा नेचुरल कलर देखील खराब होतो.

स्मोकिंग करणे

जास्त स्मोकिंग केल्याने तुमचे केस पांढरे होतात, यावर विश्वास ठेवणे करणे अवघड आहे. पण, यामुळे केस पांढरे होतात. सिगरेटमध्ये निकोटीन आणि तंबाखू असते. यामुळे तुमच्या शरीरातील रक्क वाहिन्या गोठून जातात. याचा परिणाम तुमच्या केसांवर दिसून येतो.

हेअर केअर सप्लीमेंट्स

वाढते वया बरोबर तुमच्या खाण-पिण्याच्या सवयी खूप बदलतात. यामुळे तुम्ही जास्त लक्ष देता आणि यावेळी तुमच्या डायटमध्ये बायोटीनचा समावेश केला नाही तर तुमचे केस पांढरे होऊ लगतात.

केसात हायड्रेशनची कमतरता

तुमच्या केसात हायड्रेशनची कमतरता असल्यामुळे वयाच्या आधीच केस पांढरे होतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. तुम्ही तुमच्या केसात वेळोवेळी तेल लावा, ज्यामुळे तुमच्या केसांना हायड्रेशनची कमतरता होणार नाही.


हेही वाचा – तेलकट त्वचेची घ्या अशी काळजी

 

- Advertisment -

Manini