Wednesday, May 8, 2024
घरमानिनीBeautyतेलकट त्वचेची घ्या अशी काळजी

तेलकट त्वचेची घ्या अशी काळजी

Subscribe

ज्या लोकांची त्वचा सर्वात जास्त तेलकट असते. चेहऱ्यावरील रोम छिद्रतून अतिरिक्त तेल बाहेर पडल्यामुळे त्वचा तेलकट होते. तेलकट त्वचेवर मोठे छिद्र आणि मुरुम असतात आणि ही त्वचा निर्जीव, गुळगुळीत आणि डाग असतात.बदला ऋतू हे तेलकट त्वचेचे प्रमुख कारण आहे. जास्त आद्रतेमुळे त्वचेतून घाम जास्त प्रामाणात येतो आणि यामुळे त्वचा तेलकट होते. या समस्येपासून वाचण्यासाठी त्वचा स्वच्छ करण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे.

तेलकट त्वचे ‘ही’ आहेत कारणे

अनुवांशिकता

तेलकट त्वचेसाठी अनुवांशिकता हे एक कारण आहे. आई-वडिल यांची त्वचा तेलकट असेल किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तीची त्वचा तेलकट असेल, तर तुमची त्वचा तेलकट असणे स्वाभाविक आहे.

- Advertisement -

जास्त मेकअप करणे

काही महिला या त्यांच्या त्वचे रोम छिद्र (ओपन पोर्स) आणि दाग लपवण्यासाठी मेकअपचा वापर करतात. पण, जास्त मेकअप प्रॉडक्टस वापरल्याने तुमची त्वचेचे मोठे नुकसान होते. सुंदर त्वचेसाठी कॉस्मॅटिक्सचा वापर जास्त असल्याने त्वचा सुंदर होण्याऐवजी खराब होते.

- Advertisement -

हार्मोनल बदल

तुमच्या शरीरता होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे त्वचा तेलकट होते. महिलामध्ये एंड्रोजन हार्मोन बदल होत असल्यामुळे त्वचेतील तेलकट होते. हार्मोनल बदलामुले पुरुषांमध्ये टेस्टोस्टटेरॉन हार्मोनल हे खूप जास्त प्रमाणात सक्रिय करते. यामुळे त्वचा तेलकट होते.

त्वचा तेलकट होण्यापासून असे वाचा

चेहरा योग्य पद्धतीने धुवा

तुम्ही दिवसातून दोन वेळा चेहरा धुवा. सकाळी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा चेहरा धुवा. या व्यतिरिक्त जास्त वेळ चेहरा धुवू नका. नाही तर तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. गरम किंवा कोमट पाण्याने चेहरा धुतल्याने तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. त्वचे स्वच्छ करण्यासाठी सल्फर, सॅलिसिलिक ऍसिड किंवा टीट्री ऑइल असलेले क्लीन्सर वापरा.

योग्य पद्धतीने मेकअप करा

जेव्हा तुम्ही सकाळी मेकअप करता, तेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वप्रथम प्रायमरचा बेस म्हणून उपयोग करा. यामुळे दिवसभर त्वचेचे अतिरिक्त तेल शोषून घेते आणि त्वचा ताजे आणि तेल होत नाही. तुमच्या चेहऱ्याच्या टी जोनच्या वरच्या भागात म्हणजे कपाळ आणि नाकवरील अतिरिक्त सीबमसाठी पावडर वापर करू शकता. तुमचे सर्व प्रोडक्ट्स हे ऑयल फ्री आणि मुरुम होणार नाही, असे असले पाहिजेत. तुम्ही क्रीम बेसऐवजी पावडर ब्लश आणि आयशैडोचा उपयोग करतात.

मॉइश्चरायझर योग्य निवडा

त्वचा अतिरिक्त तेल निर्माण होऊ नये. म्हणून तेलकट त्वचेला मॉयश्चरायझर करण्याची आवश्यकता असते. तेलकट त्वचेसाठी मॉइश्चराझर आणि सनस्क्रीन उपयोग करण्याचा प्रयत्न करते. या मेकअप काढण्यासाठी कोल्ड क्रीम किंवा लोशनचा उपयोग करू नका. कारण, त्वचा चिकट बनू शकते.

सनस्क्रीन लावा

दररोज सकाळी चेहरा स्वच्छ केल्यानंतर सनस्क्रीन लावायला विसरू नका. अमेरिकन एकॅडमी ऑफ इमॅर्टोलॉजी असोसिएशनुसार, सूर्यपासून निघणाऱ्या हानीकारक युवी रेझ तुमच्या त्वऱ्याला डॅमेज करतात. यामुळे तुम्ही सनस्क्रीन लावायला विसरू नका.


हेही वाचा – वॉटरप्रूफ मेकअप Remove करण्यासाठी वापरा Cleansing Balm

- Advertisment -

Manini