Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyघरच्या घरी नेलआर्ट करण्यासाठी टिप्स

घरच्या घरी नेलआर्ट करण्यासाठी टिप्स

Subscribe

आपले हात आणि नखे सुंदर असावीत अशी आपल्या सर्वांची इच्छा असते. त्यासाठी आपण अनेकदा पलरमध्ये जाऊन मॅनिक्यूर करतो. जेणेकरून हातावरील टॅनिंग दूर होईल. पण हाताच्या सौंदर्यासोबत नखांचे सौंदर्य राखणेही तितकेच महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही नेलआर्टची मदत घेऊ शकता. घरच्या घरीही नेलं आर्ट करता येते. पाहुयात नेलं आर्ट घरी करण्यासाठी टिप्स,

ग्लिटर नेल आर्ट –
नव्या डिझाईनसह नेलं आर्ट करायची असेल तर त्यासाठी ग्लिटर बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी तुम्हाला केवळ १५ मिनिटे लागतील. नखांवर ग्लिटर आणि नेलपेंट या दोन्हीचा वापर करून नेलआर्ट करता येते. रस्ताही तुम्हाला केवळ एका चिकटपट्टीची मदत घ्यावी लागेल. चिकटपट्टीच्या साहाय्याने एका बाजूला तुम्ही तुमच्या आवडीची नेलपेंट आणि दुसरीकडे ग्लिटर लावू शकता.

- Advertisement -

सिम्पल नेलआर्ट –
जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायला उशीर होत असेल अंडी नेलर्टसाठी वेळ नसले तर तुम्ही 15 मिनिटात घरबसल्या नेलं आर्ट करू शकता. यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळ्या रंगाच्या नेलपेंटचा वापर करावा लागेल. एक रंग 3 बोटांच्या नखांवर आणि दुसरा रंग 2 बोटांवर लावावा लागेल.

- Advertisement -

फ्रेंच नेल आर्ट –
स्टुडिओमध्ये नेलआर्टच्या तुम्हाला विविध डिझाइन्स पाहायला मिळतील. त्याच डिझाइन्स थोडे डोके लावून गरबसल्याही करू शकता. त्यातील एक म्हणजे त्रिकोणी डिझाइन्स. यासाठी तुम्हाला त्रिकोणी डिझाईनमध्ये नखांच्या पुढच्या भागात टेप लावावी लागते. यानंतर उरलेल्या नखावर नेलपेंट लावून घ्यायची आहे. हीच डिझाईन उलट्या पद्धतीने तुम्ही करू शकता. असे केल्याने केवळ नखांच्या वरच्या भागाला त्रिकोणी अंदाजात नखांना नेलपेंट लागलेली दिसेल.

कॅण्डी नेलआर्ट –
नखांना सुंदर आणि क्लासी लूक देण्यासाठी तुम्ही कॅण्डी नेलआर्टचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ कॅण्डीची गरज लागणार आहे.

फ्लॉवर नेलआर्ट –
नेलआर्ट करताना फ्लॉवर डिझाइन्स काढून तुम्ही नखांना हटके लूक देऊ शकता. यासाठी तुम्हाला टुथपिकचा वापर करू शकता. फुलांचे वेगवेगळे पॅटर्न तयार करून घरबसल्या नेलआर्ट तुम्ही करू शकता.

 

 


हेही वाचा : Nail Care Tips : नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? वापरा या सोप्या टिप्स

 

- Advertisment -

Manini